शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

लिपिकांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी लावणार- टोपे

By admin | Updated: July 21, 2014 00:24 IST

जालना : जिल्हा परिषदेतील लिपिक हा पंचायत राज व्यवस्थेतील सर्वात महत्त्वाचा घटक असून त्यांच्या वेतनातील त्रुटी दूर करून वेतनाचा प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करू,

जालना : जिल्हा परिषदेतील लिपिक हा पंचायत राज व्यवस्थेतील सर्वात महत्त्वाचा घटक असून त्यांच्या वेतनातील त्रुटी दूर करून वेतनाचा प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करू, अशी ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिली.जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात जि.प. लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेच्या विभागीय मेळाव्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जि.प. अध्यक्षा आशाताई भुतेकर होत्या. यावेळी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष गिरीश दाभाडकर, सचिव बापूसाहेब कुलकर्णी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मुकीम देशमुुख, जिल्हाध्यक्ष रामधन कळंबे यांची उपस्थिती होती. याप्रसंगी पालकमंत्री टोपे आपल्या भाषणात म्हणाले की, लिपिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कॅबिनेट बैठकीत आपण आग्रही भूमिका घेणार आहोत. कर्मचाऱ्यांना सुधारित आकृतीबंध लागू व्हावा, यासाठी आपण अर्थमंत्री अजित पवार व ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांच्याशी चर्चा करणार असल्याचे टोपे यांनी सांगितले. वेतनाच्या प्रश्नासह अन्य प्रश्नही मार्गी लावू, असे आश्वासन टोपे यांनी यावेळी दिले.याप्रसंगी जि.प. अध्यक्षा आशाताई भुतेकर, दाभाडकर, कुलकर्णी यांचीही समयोचित भाषणे झाली. प्रास्ताविक रामधन कळंबे यांनी केले. सूत्रसंचालन मोहन बोडले यांनी केले. मेळाव्यात विविध सत्रात मराठवाड्यातून आलेल्या जिल्हानिहाय पदाधिकाऱ्यांनी आपली मनोगत व्यक्त केले. लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेने विविध प्रश्नांबाबत शासनाकडे केलेल्या पाठपुराव्यासंबंधी माहितीही यावेळी पदाधिकाऱ्यांनी आपल्या भाषणातून दिली. त्याचप्रमाणे आगामी काळात राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमाविषयी यावेळी चर्चा करण्यात आली. या मेळाव्यास मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातील संघटनेचे पदाधिकारी, सभासद उपस्थित होते. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी संघटनेच्या जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले. मेळाव्याची सांगता सायंकाळी झाली. (प्रतिनिधी) $ि$िलपिकवर्गीय कर्मचारी संघटनेच्या मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांनी या मेळाव्यातून आपल्या भाषणातून प्रलंबित प्रश्न मार्गी लावा, असा सूर लावला. गेल्या अनेक दिवसांपासून केवळ आश्वासने मिळत आहेत. प्रत्यक्षात प्रश्न दूर व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.या मेळाव्यास मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील संघटनेचे पदाधिकारी, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेल्या तीन वर्षांपूर्वीही जालन्यात विभागीय मेळावा घेण्यात आला होता.