निलंबीत पोलिसाच्या जुगार अड्ड्यावर छापा

By Admin | Updated: November 4, 2015 00:25 IST2015-11-04T00:08:25+5:302015-11-04T00:25:14+5:30

अंबाजोगाई : तालुक्यातील पूस येथे पोलीस अधीक्षकांच्या पथकाने निलंबित पोलिसाने सुरू केलेला जुगार अड्डा उध्दवस्त केला. सोमवारी सायंकाळी १५ जुगाऱ्यांना रंगेहाथ पकडले.

Printed on suspension of the suspended police gambling | निलंबीत पोलिसाच्या जुगार अड्ड्यावर छापा

निलंबीत पोलिसाच्या जुगार अड्ड्यावर छापा


अंबाजोगाई : तालुक्यातील पूस येथे पोलीस अधीक्षकांच्या पथकाने निलंबित पोलिसाने सुरू केलेला जुगार अड्डा उध्दवस्त केला. सोमवारी सायंकाळी १५ जुगाऱ्यांना रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पूस येथीलच निलंबित पोलिस शिपायाने पूस येथे जुगार अड्डा सुरू ठेवला होता. याची गुप्त माहिती पोलीस अधीक्षकांच्या पथकास प्राप्त झाली. या माहितीवरून पथकाने पूस येथील जुगार अड्डयावर छापा टाकला. यावेळी पोलिसांना जुगाराचे साहित्य व सव्वा लाख रुपयांचा ऐवज प्राप्त झाला. यावेळी जयवंतराव देशमुख, देवराव गायके, रंगनाथ उपाडे, मधुकर पवार, शेख मैनुद्दीन शेख वजीर, युवराज सावंत, लालासाहेब जगताप, भीमराव मदने, केदारनाथ गौरशेटे, साहेबराव उदार, कालिदास जाधव, छत्रगुण पांचाळ, कचरू गायकवाड, मैनुद्दीन महेबुब पठाण, रामकृष्ण गित्ते, यांना ताब्यात घेऊन अटक केली. यावेळी एक लाख १४ हजार ७२० रुपयांचा ऐवज हस्तगत केला. या प्रकरणी बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून १४ जणांना अटक करण्यात आली. (वार्ताहर)

Web Title: Printed on suspension of the suspended police gambling