धर्मगुरुंच्या उपस्थितीत पट्टाभिषेक

By Admin | Updated: February 3, 2015 00:58 IST2015-02-03T00:31:28+5:302015-02-03T00:58:47+5:30

देवणी : येथील श्री गुरुलिंगेश्वर विरक्त मठाचा पट्टाभिषेक सोहळा सोमवारी धर्मगुरु व मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला़ विविध धार्मिक कार्यक्रमांनी भक्तीमय झालेल्या

In the presence of religious leaders, Pattabhishek | धर्मगुरुंच्या उपस्थितीत पट्टाभिषेक

धर्मगुरुंच्या उपस्थितीत पट्टाभिषेक


देवणी : येथील श्री गुरुलिंगेश्वर विरक्त मठाचा पट्टाभिषेक सोहळा सोमवारी धर्मगुरु व मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला़ विविध धार्मिक कार्यक्रमांनी भक्तीमय झालेल्या देवणीतील सोहळ्यात जगद्गुरुंनी आशिर्वचन व मानव कल्याणाची प्रार्थना केली़ यावेळी श्री गुरुलिंगेश्वर विरक्त मठाचे मठाधिपती श्री सिद्धलिंग देवरु यांना चिन्मयदीक्षा देण्यात आली़
मागील तीन दिवसांपासून देवणीत पट्टाभिषेक सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले़ काशीपीठाचे जगद्गुरु डॉ़चंद्रशेखर महास्वामी, गदग येथील जगद्गुरु डॉ़सिद्धलिंग महास्वामी, डॉ़शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्यासह विविध धर्मगुरुंनी आशिर्वचनातून मानव कल्याणाचा व विश्वशांतीचा हितोपदेश केला़ सोमवारी सकाळी श्री गुरुलिंगेश्वर विरक्त मठाचे मठाधिपती श्री सिद्धलिंग देवरु यांना चिन्मयदीक्षा देण्यात आली़ अध्यक्षस्थानी हुलसूर मठाचे गुरु शिवानंद महास्वामी होते़ दुपारी हावगीलिंग शिवाचार्य, शंकरलिंग शिवाचार्य, बसवलिंग शिवाचार्य, संगनबसव महाराज, सिद्धलिंग महास्वामी, नीळकंठ महास्वामी, शिवमूर्ती शिवाचार्य, सिद्धरेणुका महाराज, प्रशांत देवरु, ईश्वरनंद स्वामी, शिवानंद स्वामी, मृगेंद्र देवरु, रुद्रमणी देवरु, चनमल्ला देवरु, करबसय्या स्वामी, राजेंद्र देवरु, बस्वलिंग महास्वामी, स्वामीनाथ महाराज, गुरुनजेश्वर महास्वामी, राजेश्वर महाराज, विरुपाक्ष शिवाचार्य व हजारो भाविकांच्या उपस्थितीत पीठारोहण करण्यात आले़ यावेळी विविध धार्मिक विधी पार पडले़ त्यानंतर नूतन मठाधिपती सिद्धलिंग देवरु यांची शहरातून अड्डपालखी मिरवणूक काढण्यात आली़ या कार्यक्रमांना परिवहन राज्यमंत्री विजयकुमार देशमुख, खा़डॉ़सुनिल गायकवाड, आ़संभाजी पाटील, माजी आ़टी़पी़ कांबळे, मनोहर पटवारी, प्रकाश खंड्रे, शिवराज गंदगे, नागनाथ निडवदे, भगवानराव पाटील तळेगावकर, लिंबन महाराज रेश्मे, उपसभापती तुकाराम पाटील, सरपंच देविदास पतंगे, उपसरपंच बाबुराव इंगोले यांची उपस्थिती होती़ प्रास्ताविक मल्लिकार्जून मानकरी यांनी केले़ सूत्रसंचालन मनोहर पटणे, रमेश मन्सुरे यांनी, तर आभार प्रा़रेवण मळभागे यांनी मानले़ (वार्ताहर)

Web Title: In the presence of religious leaders, Pattabhishek