कारभा-यांचे भवितव्य मतपेटीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 23:48 IST2017-10-07T23:48:07+5:302017-10-07T23:48:07+5:30

जिल्ह्यात ६५३ ग्रामपंचायतसाठी शनिवारी शांततेत मतदान झाले.

Polling for gram panchayat elections | कारभा-यांचे भवितव्य मतपेटीत बंद

कारभा-यांचे भवितव्य मतपेटीत बंद

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड: जिल्ह्यात ६५३ ग्रामपंचायतसाठी शनिवारी शांततेत मतदान झाले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी ६० टक्के मतदान झाल्याचे निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले. प्रत्येक मतदान केंद्रांवर कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावे, यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. परळी तालुक्यातील सिरसाळ्यात उशिरापर्यंत मतदान सुरु होते.
जिल्ह्यातील १०३१ ग्रा.पं.पैकी ६९० ग्रामपंचायतींसाठी पहिल्या टप्प्यात मतदान होत आहे. पैकी ३१ ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली आहे. सदस्यपदाच्या ५८४४ जागांपैकी ७६९ जागा पूर्वीच बिनविरोध झाल्या. २७ जागांसाठी नामनिर्देशनपत्रेच दाखल झाली नाहीत. त्यामुळे आता ५ हजार ७५ जागांसाठी मतदान होणार आहे, तर ४८ ग्रापंमध्ये सरपंच बिनविरोध आला असून, आता ६४२ सरपंच पदासाठी मतदान होईल.
शुक्रवारी मुक्कामी गेलेल्या कर्मचा-यांनी शनिवारी पहाटेच मतदानासाठी यंत्र सज्ज केली. सकाळी सात वाजल्यापासूनच मतदारांनी मतदान करण्यासाठी केंद्राबाहेर रांगा लावल्या होत्या. गडबड गोंधळ होणार नाही, यासाठी केंद्राबाहेर व मतदारांच्या रांगांजवळ पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. त्यामुळे सर्वांनीच शांततेत आपला हक्क बजावला.

Web Title: Polling for gram panchayat elections