शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

प्लॉट खरेदी-विक्री होणार सुलभ !

By admin | Updated: July 18, 2014 01:48 IST

लातूर : नाहरकत प्रमाणपत्रांच्या कचाट्यामुळे महापालिका व नगरपालिका हद्दीतील बिगर शेतजमीन अर्थात प्लॉट खरेदी-विक्रीला एन.ए. चा मोठा अडसर होता.

लातूर : नाहरकत प्रमाणपत्रांच्या कचाट्यामुळे महापालिका व नगरपालिका हद्दीतील बिगर शेतजमीन अर्थात प्लॉट खरेदी-विक्रीला एन.ए. चा मोठा अडसर होता. मात्र आता एन.ए.ची अट शिथील झाली आहे. चौरस मीटर प्रमाणे एन.ए. वसुलीवरही काही निर्बंध आले आहेत. त्यामुळे नवीन प्लॉट खरेदी-विक्री आता सुलभ होणार आहे.तहसीलदारांचे नाहरकत प्रमाणपत्र, नगररचनाकारांचे नाहरकत, टाऊन प्लॅन, तहसीलदारांचा स्थळ पाहणी अहवाल व ले-आऊट पाहून बिगर शेत जमिनीसाठी एन.ए. चा परवाना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत दिला जात होता. मात्र या अटीतून सुटका मिळाली आहे. मनपा व नगरपालिका हद्दीत विकास आराखडा मंजूर असल्यानंतर एन.ए. परवान्याची गरजच लागणार नाही. मात्र त्यात शहर आराखडा मंजूर असणे आवश्यक आहे. रस्त्याच्या लांबीनुसार रुंदी, जमीन क्षेत्राच्या १० टक्के खुली जागा सोडणे, राज्यमार्ग किंवा जिल्हा मार्ग त्या जमिनीतून असेल, तर ४० फुटांचा सेवामार्ग सोडणे, त्याचबरोबर शॉपिंग सेंटर, खेळाचे मैदान, स्मशानभूमी, शाळा-बगिचा व लोकसंख्येच्या प्रमाणात सुविधा आणि त्यात रस्ते प्रस्तावीत असावे लागतील. या विकास आराखड्यानुसार बांधकाम परवाने दिले जातात. आता इथे एन.ए. परवान्याची गरज लागणार नाही. दरम्यान, ग्राहकही एन.ए. पाहूनच प्लॉट खरेदी-विक्री करीत होता. टाऊन प्लॅन, नगररचनाकारांचा परवाना याबाबी दुय्यम होत्या. एन.ए. आवश्यकच होता. मात्र आता एन.ए.ची अट शिथील झाली आहे. मनपा, नगरपालिकेच्या व सूक्ष्म प्राधिकाऱ्याची परवानगी मिळाल्यानंतर आता फक्त महसूल विभागाला कळविणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)शुल्क कमी होण्याची शक्यता...चौरस मीटर प्रमाणे एन.ए. ची वसुली महसूल विभागामार्फत केली जात होती. ती आता नगरपालिका, महानगरपालिकांकडून होईल. शहरातील झोननुसार एन.ए. चे शुल्क होते. आता ते शुल्क पालिका किंवा संबंधित महापालिका ठरवेल. चौरस मीटरला लातूर शहरात झोन क्र. १ मध्ये ९ रुपये ७२ पैसे, झोन क्र. २ मध्ये ११.३२ पैसे, झोन क्र. ३ मध्ये १० रुपये ८ पैसे आणि झोन क्र. ४ मध्ये १२ रुपये ४ पैसे अशा शुल्काची आकारणी केली जात होती. हे शुल्कही कमी होईल, असा अंदाज महसूल, नगररचनाकार आणि महापालिका सूत्रांकडून सांगण्यात आले. पूर्वीप्रमाणे झोनवाईज शुल्क राहील. परंतु, ते शुल्क संबंधित पालिकांकडे घेतले जाईल.वेळ आणि पैशाची बचत...लातूर जिल्ह्यातील लातूर मनपा, उदगीर, अहमदपूर, औसा आणि निलंगा नगरपालिकेच्या हद्दीत विकास आराखडा मंजूर आहे. आता या सर्व संस्थांमध्ये बिगर शेतजमिनीच्या विक्रीसाठी एन.ए.ची गरज लागणार नाही. मात्र मूळ मोजणी नकाशा, सातबारा, ८ अ चा उतारा, ले-आऊट, नियमानुसार तयार केलेल्या रेखांकनाच्या पाच प्रती या बाबी आवश्यक राहतीलच, अशी माहिती लातूर शहराचे सहाय्यक नगररचनाकार एस.पी. मिटकरी यांनी दिली. बुधवारीच राज्य मंत्रिमंडळाने एन.ए. बाबतचा निर्णय घेतला आहे. मात्र या संदर्भात अद्याप अध्यादेश आला नाही. परंतु, नवीन प्लॉट खरेदी-विक्री या निर्णयामुळे सुलभ होऊ शकते. वेळ आणि पैशाची बचत या निर्णयामुळे होईल, असे जाणकारांचे म्हणणे आहे.