शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
3
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
4
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
5
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
7
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
8
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
9
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
10
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
11
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
12
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
13
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
14
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
15
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
16
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
17
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
18
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
19
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
20
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

नगरपरिषदेमुळे होणार नियोजनबद्ध विकास

By admin | Updated: August 29, 2014 01:32 IST

औरंगाबाद : नगर परिषदेच्या स्थापनेमुळे सातारा आणि देवळाई परिसराचा नियोजनबद्ध विकास होणार आहे. केंद्र सरकारच्या विविध योजनांतर्गत रस्ते, पाणीपुरवठा योजना,

नगरपरिषदेमुळे होणार नियोजनबद्ध विकासऔरंगाबाद : नगर परिषदेच्या स्थापनेमुळे सातारा आणि देवळाई परिसराचा नियोजनबद्ध विकास होणार आहे. केंद्र सरकारच्या विविध योजनांतर्गत रस्ते, पाणीपुरवठा योजना, ड्रेनेज यासारख्या पायाभूत सुविधांसाठी नगर परिषदेला भरघोस अनुदान मिळू शकणार आहे. तसेच नगर परिषदेला पुरेसा कर्मचारी वर्गही मिळणार आहे.ग्रामपंचायतींना विकासकामांसाठी सरकारकडून अत्यल्प निधी मिळत असतो. मात्र, आता नगर परिषदेच्या स्थापनेमुळे अनुदानात मोठी वाढ होणार आहे. केंद्र सरकारच्या विविध योजनांतर्गत नगर परिषदांना दरवर्षी लाखो रुपयांचा निधी मिळतो. सध्या ग्रामपंचायतीत मोजकाच कर्मचारी वर्ग आहे. नगर परिषदेमुळे आता या ठिकाणी पुरेसा कर्मचारी वर्ग लाभणार असून, त्यांचे पगार हे राज्य सरकारकडून होतील. नगर परिषदेत पाणीपुरवठा, बांधकाम आणि नियोजन, अशा तीन विभागांसाठी तीन अभियंतेही असणार आहेत. विकास आराखडा बनेलसातारा आणि देवळाई गावांच्या हद्दीत सध्या वेगाने बांधकामे होत आहेत; पण या भागासाठी अद्याप विकास आराखडा अस्तित्वात आलेला नाही. मध्यंतरी सरकारने सातारा- देवळाईसह २८ गावांच्या विकास आराखड्याचे काम सिडकोला दिले होते. सिडकोने हा आराखडा तयार केला असला तरी त्याला मंजुरी मिळालेली नाही. नगर परिषद अस्तिवात आल्यानंतर पहिल्यांदा नगर परिषद हद्दीचा विकास आराखडा तयार होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. ‘ब’ वर्गाची नगर परिषद असेलसातारा-देवळाई ही ‘ब’ वर्ग प्रकारातील नगर परिषद असणार आहे. सातारा देवळाई संयुक्त नगर परिषदेची लोकसंख्या ५१ हजार इतकी आहे. जिल्ह्यातील ६ नगर परिषदांपैकी केवळ सिल्लोड ही ‘ब’ वर्ग नगर परिषद आहे. उर्वरित पाचही नगर परिषदा या ‘क’ वर्गातील आहेत. सातारा-देवळाई नगर परिषदेमुळे जिल्ह्यातील नगर परिषदांची संख्या ७ झाली आहे.औरंगाबाद : नगर परिषद स्थापनेच्या निर्णयाची माहिती मिळताच सातारा आणि देवळाई परिसरात आनंदोत्सव साजरा झाला. नागरिकांनी ठिकठिकाणी एकत्र येऊन फटाके वाजविले. सातारा गावात ढोल-ताशांसह मिरवणूकही काढण्यात आली. ४सातारा आणि देवळाई भागात सायंकाळीच संयुक्त नगर परिषद स्थापनेची माहिती येऊन धडकली. त्यानंतर या भागात एकच जल्लोष झाला. सातारा गावात मुख्तार पटेल यांनी जोरदार मिरवणूक काढली. गुलालाची उधळण करीत ढोल-ताशांच्या गजरात ही मिरवणूक निघाली. यामध्ये गावातील तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले. नगर परिषदेमुळे सातारा आणि देवळाईचा चांगल्या पद्धतीने विकास होईल. सातारा-देवळाई भागात पाण्याचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. हा प्रश्न आता नक्कीच सुटेल. नगर परिषदेसाठी सतत पाठपुरावा केला. त्याला आज यश मिळाले. त्यामुळे शासनाचे आभार. फेरोज पटेल, माजी सरपंच, सातारासातारा- देवळाई नगर परिषद एकत्र व्हावी म्हणून मुंबई मंत्रालयात खेट्या मारल्या. शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, पालकमंत्री बाळासाहेब थोरात, वनमंत्री पतंगराव कदम, दुग्ध व्यवसाय व पशुसंवर्धनमंत्री अब्दुल सत्तार, आ. कल्याण काळे, आ. सुभाष झांबड आदींच्या प्रयत्नांमुळे ग्रामविकास व नगरविकास मंत्रालय आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सकारात्मक भूमिकेने जनतेला न्याय मिळाला. -सरपंच करीम पटेल, देवळाई