शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांच्या इशाऱ्याने 'लाडकी बहीण' विरोधात याचिका, पण आम्ही कोर्टातही जिंकू: मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2024 20:14 IST

''रक्षाबंधनापूर्वी खात्यावर ३ हजार रुपये टाकणार''; लाडक्या बहिणींसमोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नतमस्तक

- श्यामकुमार पुरेसिल्लोड:  माझी लाडकी बहीण योजनेसाठी ४५ हजार कोटी रुपयांची व  लाडका भाऊ योजनेसाठी १० हजार कोटीं रुपयांची सरकारने तरतूद केली आहे. मात्र विरोधकांच्या पोटात दुखत आहे, त्यांनी कोणाला तरी सांगून न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मात्र,आम्ही कोर्टात ही जिंकू व ही योजना कायमस्वरूपी माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत सुरू ठेऊ, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. सर्व जातीपातीच्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेत खोडा घालणाऱ्या विरोधकांवर तुम्ही लक्ष ठेवा असे सांगून त्यांनी विरोधकावर तोफ डागली. 

महिला सक्षमीकरण अभियान अंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ करण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिल्लोड येथे आले होते. त्यांचा  चिकालढाणा विमानतळा पासून ते सिल्लोड पर्यंत ठीक ठिकाणी सत्कार करण्यात आला कार्यक्रमासाठी  आलेल्या महिलाचा जनसागर  बघून मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे सर्व महिलां समोर स्टेजवर नतमस्तक झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझी लाडकी बहीण योजना आणून क्रांतिकारक निर्णय घेतला आहे,असे पालकमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले. 

रक्षाबंधनपूर्वी पैसे खात्यातछत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ५ लाख ४० हजार महिलांनी माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत  ऑनलाइन व ऑफ लाईन अर्ज दाखल केले आहे. त्यापैकी त्रुटी नसलेले दोन लाख अर्ज यावेळी मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी मंजूर झाल्याची घोषणा केली. तसेच रक्षाबंधन पूर्वी त्या महिलांच्या खात्यावर दोन हप्त्यांचे ३ हजार रुपये जमा केले जातील,असेही मुख्यमंत्री म्हणाले.

खोट्या प्रचाराला बळी पडू नकाआम्ही राज्य समृद्ध करणार,दुष्काळाची ओळख पुसणार,नदी जोड प्रकल्प राबवणार,पाणी टंचाई साठी वाटत ग्रीड योजना राबवित आहे.संभाजी नगर मध्ये आम्ही उद्योग आणले त्यातून अनेक बेरोजगारांना रोजगार मिळेल मात्र विरोधक चिडले आहे संपवण्याची भाषा करत आहे.मात्र या राज्यात जनता हुशार आहे  अशा लोकांना जनता सहन करणार नाही विरोधकांच्या  खोट्या प्रचाराला बळी पडू नका असे ही शिंदे म्हणाले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेAurangabadऔरंगाबादAbdul Sattarअब्दुल सत्तार