शहरं
Join us  
Trending Stories
1
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
2
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
3
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
4
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
5
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
7
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
8
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
9
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
10
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
11
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
12
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
13
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
14
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
15
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
16
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
17
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
18
मॅरिड बॉयफ्रेंडसाठी सेल्स गर्लने १.६६ कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, पण आंघोळीला गेली अन् घात झाला
19
Sanjay Raut: "लोक भाजपला मतदान करून आपल्या कर्माची फळं भोगतायत!" संजय राऊत असं का म्हणाले?
20
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्याबद्दल अतीव आस्था, येथील गुणवत्तावाढीच्या कार्यात सदैव सोबत असेल: शरद पवार

By सुमेध उघडे | Updated: November 19, 2022 15:33 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या ६२ व्या दीक्षांत समारंभात शरद पवार आणि नितीन गडकरी यांना डिलीट पदवीने सन्मानित करण्यात आले

औरंगाबाद: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळामध्ये शैक्षणिक कामात प्रगती नसतांना येथे लक्ष घातले आणि मिलिंदच्या माध्यमातून शिक्षण दिले. महाराष्ट्राला अभिमान वाटावा असे हे विद्यापीठ आहे. याच्या निर्मितीपासूनचा कालखंड मला आठवतो. याच्या जडणघडणीत माझा समावेश होता याचा आनंद आहे. आज विद्यापीठाने डिलीट पदवी प्रदान केली यासाठी अंतकरणापासून आभारी आहे. नितीन गडकरी आणि माझ्या कामाची दखल घेतली गेली यासाठी कृतज्ञता व्यक्त करतो, अशा भावना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केल्या.  

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या ६२ व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, या विद्यापीठाच्या स्थापनेत माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मोठा वाटा आहे. या भागात विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय नेतृत्वाने घेऊन संपूर्ण मराठवाड्याच्या शिक्षणाचे दालन खुले झाले. विद्यापीठासाठी संघर्ष झाला. याचा भागात आणखी एक विद्यापीठ स्थानक करण्याच्या प्रक्रियेत माझा सहभाग होता याचा आनंद आहे. यामुळे येथे शैक्षणिक दालन खुले झाले. 

उसावरील संशोधनासाठी जालन्यात केंद्र
मराठवाड्याची शेती बदलत आहे. पहिले फक्त कापूस, बाजरी होती. आता ऊस उत्पादनात मराठवाडा राज्यात अग्रेसर आहे. देश पातळीवरील उसावर संशोधन करणाऱ्या संस्थेचे अध्यक्षपद माझ्याकडे आहे. याच माध्यमातून मराठवाड्यात उसाच्या शेतात क्रांती घडवणारी आणि तांत्रिक सुविधा देणारी संस्था सुरू करण्यासाठी जालना येथे 100 एकर जमीन खरेदी करून काम सुरू करतो आहे. त्यानंतर नितीन गडकरी यांच्या मदतीने नागपूर येथे या प्रकारचे केंद्र लवकरच सुरु होईल.

गुणवत्तावाढीसाठी सदैव सोबत 
मला शैक्षणिक संस्थानची काळजी वाटते. त्यामुळे दर्जा सुधारण्याची गरज आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर सिद्ध करायचे असेल तर आपल्याला शैक्षणिक दर्जा सुधारावा लागेल. हे सर्व करण्यात सर्वात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अग्रेसर राहील, अशी अपेक्षा व्यक्त करतो.  आपण सर्व क्षेत्रात कसे आघाडीवर राहू याची काळजी घेऊ. आपल्यातील, मराठवाड्यासाठी अतीव आस्था असलेल्या सहकारी म्हणून गुणवत्ता वाढीसाठी कशी दोन पाऊले पुढे टाकू आणि यशस्वी होऊ या कार्यात सोबत राहील याचा विश्वास देतो, अशी ग्वाही देतो असेही शरद पवार म्हणाले. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादSharad Pawarशरद पवार