परळीत कोळशाची टंचाई कायम

By Admin | Updated: December 3, 2014 01:16 IST2014-12-03T00:55:46+5:302014-12-03T01:16:53+5:30

परळी: परळी औष्णिक विद्युत केंद्राला कोळशाची टंचाई भासू लागली आहे. नवीन व जुन्या औष्णिक केंद्रात सध्या २० हजार टन कोळसा शिल्लक आहे. विजनिर्मितीसाठी

Parli also has a shortage of coal | परळीत कोळशाची टंचाई कायम

परळीत कोळशाची टंचाई कायम


परळी: परळी औष्णिक विद्युत केंद्राला कोळशाची टंचाई भासू लागली आहे. नवीन व जुन्या औष्णिक केंद्रात सध्या २० हजार टन कोळसा शिल्लक आहे. विजनिर्मितीसाठी एका संचाला दररोज अंदाजे ४ हजार टन कोळसा लागतो. सध्या एकुण पाच संचापैकी तीन संचच चालु आहेत. या तीन संचाला दोना दिवस पुरेल एवढाच कोळशाचा साठा शिल्लक आहे. कोळशाच्या टंचाईमुळे संच क्र.४ हा दिवाळीपासून बंद असल्याने या संचातून वीज निर्मिती ठप्प झाली आहे तर संच क्र. ३ हा गेल्या दीड वर्षापासून पाण्याच्या समस्येमुळे बंद ठेवलेला असून अद्याप सुरु केलेला नाही.
परळी येथील औष्णिक विद्युत केंद्रात सध्या दोन दिवस पुरेल एवढाच कोळशाचा साठा शिल्लक आहे. जेवढा कोळसा आवश्यक आहे तेवढाचा कोळया येत असल्याने अधिकाऱ्यांची तारांबळ उडत आहे. जुन्या औष्णिक विद्युत केंद्रातील सध्या एकच संच चालु असून या ठिकाणी ४ हजार ८०० टन कोळसा शिल्लक आहे तर नवीन औष्णिक विद्युत केंद्रातील दोन संच चालु आहे. या ठिकाणी १६ हजार टन कोळसा उपलब्ध आहे. दररोज एका संचासाठी ४ हजार टन कोळशाची गरज भासते. या संदर्भात परळी औष्णिक केंद्राचे अधिक्षक अभियंता मनोहर खांडेकर म्हणाले, दोन दिवस पुरेल एवढाच कोळशाचा साठा शिल्लक आहे.
आज दोन रेल्वे रॅक कोळया येण्याची शक्यता आहे तर विजनिर्मितीसाठी डिसेंबर महिन्यापर्यंत पुरेल एवढाचा पाणीसाठा आहे. दरम्यान, एकुण पाच संचापैकी नवीन औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्र. ६, ७ व जुन्या औष्णिक केंद्रातील संच क्र.५ असे एकुण तीन संच चालू आहेत. या तीन संचातून मंगळवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ५६७ मेगाव्हॅट विजेचे उत्पादन सुरु होते. (वार्ताहर)

Web Title: Parli also has a shortage of coal