परभणीचे तापमान ४४ अंशावर

By Admin | Updated: April 22, 2016 00:23 IST2016-04-22T00:21:54+5:302016-04-22T00:23:54+5:30

परभणी : बुधवारी या उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमान जिल्ह्यात नोंद झाल्यानंतर गुरुवारी मात्र त्यात अल्पशी घट होत परभणीचा पारा ४४ अंशावर स्थिरावला़

Parbhani temperature is 44 degrees | परभणीचे तापमान ४४ अंशावर

परभणीचे तापमान ४४ अंशावर

परभणी : बुधवारी या उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमान जिल्ह्यात नोंद झाल्यानंतर गुरुवारी मात्र त्यात अल्पशी घट होत परभणीचा पारा ४४ अंशावर स्थिरावला़
यावर्षी जिल्ह्यात तापमान चांगलेच वाढले आहे़ एप्रिल महिन्यातच पारा ४४ अंशावर पोहचल्याने परभणीकर त्रस्त झाले आहेत़ विशेष म्हणजे बुधवारी जिल्ह्याचे तापमान ४४़२ अंश एवढे होते़ त्यात गुरुवारी केवळ ०़२ अंशाची तापमानात घट झाली़ दिवसभर कडक उन्हाने नागरिक त्रस्त झाले होते़ शहरातील रस्त्यावरही तुरळक स्वरुपाची वाहतूक पहावयास मिळाली़
यावर्षी मार्चपासून जिल्ह्याचा पारा ४० अंशाच्या पुढे सरकारला आहे़ त्यामुळे उन्हाच्या तिव्रतेत वाढ झाली असून, दिवसभर कडक ऊन आणि रात्री उकाडा जाणवत आहे़ उन्हाचा सर्वाधिक फटका बालके आणि ज्येष्ठ नागरिकांना बसत आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Parbhani temperature is 44 degrees