शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

परळी आडत बाजारपेठ चार दिवसांपासून बंद

By admin | Updated: July 9, 2014 00:27 IST

परळी: येथील आडस बाजारपेठ मागील चार दिवसांपासून बंद असल्याने कोटीचे व्यवहार ठप्प झाले आहेत. सोमवारपासून या बाजारपेठेत खरेदी-विक्री ठप्प आहे.

परळी: येथील आडस बाजारपेठ मागील चार दिवसांपासून बंद असल्याने कोटीचे व्यवहार ठप्प झाले आहेत. सोमवारपासून या बाजारपेठेत खरेदी-विक्री ठप्प आहे. येथील आडत बाजारपेठ मागील गुरुवारपासून बंद आहे. सोमवारीही खरेदी-विक्री आडत बाजारात झाली नाही. धान्यांचे बीट निघालेच नाही. त्यामुळे दररोज कोटीच्यावर होणारी धान्यांची होणारी खरेदी-विक्री ठप्प झाली आहे. सोमवारी बीडच्या सहकारी संस्थांचे जिल्हा निबंधक वांगे यांनी परळी कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयात काही व्यापाऱ्यांची बैठक घेतली व त्यांच्याशी चर्चा केली.३० जून रोजी परळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती वंदना पवार व आडत व्यापारी श्रीधरराव मुंडे यांच्यात वाद झाला होता. श्रीधरराव मुंडे यांच्या विरोधात १ जुलै रोजी परळी शहर पोलीस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. श्रीधरराव मुंडे यांच्याविरुद्ध अन्यायकारक कारवाई केल्याच्या निषेधार्थ ३ जुलैपासून आडत व्यापाऱ्यांनी आडत व्यवहार बंद ठेवला आहे. सोमवारीही आडत बाजारपेठ उघडली नव्हती, त्यामुळे खरेदीदारांचीही मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली होती. सोमवारी बाजार समितीच्या सचिव वंदना पवार यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.खरेदीदारांचे हालया आडत बाजारात परळी तालुक्यातील खेडेगावातील नागरिक विविध धान्य खरेदी-विक्रीसाठी येत असतात. ही बाजारपेठ मागील चार दिवसांपासून बंद असल्याने येथे खरेदीसाठी येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. व्यापारी मात्र आडत बाजार सुरू करण्यास पुढे येत नसल्याचे दिसून येत आहे.व्यापारी व कृउबा सचिवाचा वाद३० जून रोजी बाजार समितीच्या सचिव वंदना पवार व आडत व्यापारी श्रीधरराव मुंडे यांच्यात वाद झाला होता. हा वाद झाल्यानंतर पवार यांनी मुंडे यांच्या विरोधात शहर ठाण्यात तक्रार दिली होती. व्यापारी मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल केला याच्या निषेधार्थ येथील बाजार समितीच्या व्यापाऱ्यांनी आडत बंद ठेवून आपला निषेध व्यक्त केला. बाजार सुरू करण्याची मागणी होत आहे.(वार्ताहर)गुरुवारपासून बाजारपेठ ठेवण्यात आली बंदचार दिवस उलटूनही बाजारपेठ सुरू करण्यास व्यापारी पुढे येईनातखरेदीदारांची होतेय गैरसोयबाजार समिती सचिव वंदना पवार, आडत व्यापारी, श्रीधरराव मुंडे यांच्यात ३० जून रोजी झाला होता वादपवार यांच्या फिर्यादीवरुन शहर पोलीस ठाण्यात मुंडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल