जायकवाडी कालव्यात बुडालेल्या तिघांचे मृतदेह ३ दिवसांनी सापडले; वाचवणाऱ्याचाही दुर्दैवी अंत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 19:51 IST2026-02-26T19:50:04+5:302026-02-26T19:51:22+5:30

वाचवायला गेला अन् स्वतःचा जीव गमावला; जायकवाडी कालव्यातील 'त्या' तिघांचे मृतदेह अखेर सापडले

Paithan Tragedy: Bodies of 3 People Missing in Jayakwadi Canal Recovered After 3 Days | जायकवाडी कालव्यात बुडालेल्या तिघांचे मृतदेह ३ दिवसांनी सापडले; वाचवणाऱ्याचाही दुर्दैवी अंत!

जायकवाडी कालव्यात बुडालेल्या तिघांचे मृतदेह ३ दिवसांनी सापडले; वाचवणाऱ्याचाही दुर्दैवी अंत!

पैठण: चांगतपुरी शिवारातील जायकवाडीच्या उजव्या कालव्यात कार कोसळून बेपत्ता झालेल्या तिघांचे मृतदेह तीन दिवसांच्या अथक शोधमोहिमेनंतर बुधवारी हाती आले आहेत. मृतांमध्ये कोरडगाव येथील शेख दांपत्य आणि त्यांना वाचवण्यासाठी प्राणांची बाजी लावणारा स्थानिक तरुण रावसाहेब खडेकर यांचा समावेश आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण पैठण तालुक्यासह अहिल्यानगर जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.

अपघात आणि बेपत्ता होण्याचा थरार
सोमवारी रात्री मुकीद अहमद शेख (३५) आणि त्यांच्या पत्नी निलोफर शेख (३०, रा. कोरडगाव, जि. अहिल्यानगर) हे नातेवाईकासह कारने जात असताना चांगतपुरी शिवारात रस्ता चुकले. कार रिव्हर्स घेताना ती थेट उजव्या कालव्याच्या खोल पाण्यात कोसळली. चालक अल्ताफ पठाण पोहून बाहेर आले, मात्र शेख पती-पत्नी पाण्यात बुडू लागले. त्यांना वाचवण्यासाठी जवळच राहणाऱ्या रावसाहेब खडेकर या तरुणाने क्षणाचाही विचार न करता कालव्यात उडी घेतली, मात्र प्रवाहाचा वेग जास्त असल्याने तिघेही बेपत्ता झाले.

वेगवेगळ्या ठिकाणी सापडले मृतदेह
बुधवारी सकाळी गेवराई तालुक्यातील गुळज शिवारात एका शेतकऱ्याला निलोफर शेख यांचा मृतदेह मोटारीच्या हुकला अडकलेला दिसला. त्यानंतर सायंकाळी ५:३० च्या सुमारास खांडपिंपरी-पेंगेवाडी शिवारात रावसाहेब खडेकर यांचा मृतदेह स्थानिक शेतकऱ्यांना आढळून आला. रात्री उशिरा अग्निशमन दलाच्या टीमला मुकीद शेख यांचाही मृतदेह शोधण्यात यश आले.

दोन चिमुकले झाले पोरके
शेख दांपत्य आपल्या १२ वर्षांच्या मुलीला आणि ८ वर्षांच्या मुलाला चुलत्याकडे सोडून प्रवासाला निघाले होते, मात्र तो प्रवास त्यांचा शेवटचा प्रवास ठरला. स्वतःचा जीव धोक्यात घालून दुसऱ्याला वाचवणाऱ्या रावसाहेब खडेकर यांच्या निधनाने चांगतपुरी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलीस निरीक्षक महादेव गोमारे आणि उपनिरीक्षक प्रमोद यादव यांच्या मार्गदर्शनाखाली ही शोधमोहीम राबवण्यात आली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पैठणच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

Web Title : कार दुर्घटना के बाद नहर में डूबे तीन लोगों के शव मिले; बचाने वाला भी मरा

Web Summary : जायकवाड़ी नहर में कार गिरने से डूबे तीन शव बरामद हुए, जिनमें एक दंपति और बचाने वाला शामिल है। दंपति की कार गलती से नहर में गिर गई। एक स्थानीय व्यक्ति ने बहादुरी से उन्हें बचाने के लिए छलांग लगाई, लेकिन तीनों डूब गए। दो बच्चे अनाथ हो गए। तीन दिन बाद खोज अभियान समाप्त हुआ।

Web Title : Three Found Dead in Canal After Car Accident; Rescuer Dies

Web Summary : Three bodies, including a couple and their rescuer, were found in Jaikwadi canal after their car plunged in. The couple's car accidentally fell into the canal. A local man heroically jumped in to save them, but all three drowned. Two children are orphaned. Search operation concluded after three days.