़़़तर नासलेल्या दुधाने अभिषेक घालू

By Admin | Updated: December 5, 2014 00:55 IST2014-12-05T00:25:25+5:302014-12-05T00:55:00+5:30

आष्टी : सत्ताधारी केवळ शेतकऱ्यांबद्दल पुळका दाखवतात़ शेतकरी विरोधी सत्ताधाऱ्यांनी महिन्यामध्ये एकही धड निर्णय घेतला नाही़ दुधाचे भाव वाढविले नाही

Otherwise, abhishek should be taken from the milk | ़़़तर नासलेल्या दुधाने अभिषेक घालू

़़़तर नासलेल्या दुधाने अभिषेक घालू


आष्टी : सत्ताधारी केवळ शेतकऱ्यांबद्दल पुळका दाखवतात़ शेतकरी विरोधी सत्ताधाऱ्यांनी महिन्यामध्ये एकही धड निर्णय घेतला नाही़ दुधाचे भाव वाढविले नाही तर नासलेल्या दुधाने मंत्र्यांना अभिषेक घालू, असा इशारा माजी राज्यमंत्री सुरेश धस यांनी दिला़
दूध भाववाढीसह इतर मागण्यांसाठी धस यांच्या नेतृत्वाखाली गुरूवारी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले़ यावेळी धस बोलत होते़ ते म्हणाले, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सत्ताधारी पाऊले उचलत नाहीत हे दुर्दैव आहे़ कापूस, सोयाबीन, कांदा, ऊस पिकविणाऱ्या शेतकऱ्यांची पुरती दैना झाली आहे़ निसर्गाने तर वेठीस धरले परंतु सरकारही हालचाली करायला तयार नाही, असे ते म्हणाले़ सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांची कुठलीही चिंता नाही, असा आरोप करून दहा दिवसात उपाययोजना करा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला़
यावेळी सरकारविरोधी घोषणा देण्यात आल्या़ त्यामुळे परिसर दणाणून गेला़ जि़ प़ सभापती महेंद्र गर्जे, सदस्य सय्यद अब्दुल्ला, देविदास धस यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते़ (वार्ताहर)४
आष्टी येथे रास्ता रोको
४दूध दरवाढीसह दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी शेतकरी रस्त्यावर
४दोन तास बीड - अहमदनगर राज्य रस्त्यावर वाहतूक ठप्प़

Web Title: Otherwise, abhishek should be taken from the milk