उस्मानाबादचा दणदणीत विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 00:22 IST2018-05-30T00:21:52+5:302018-05-30T00:22:31+5:30

प्रथमेश पाटील याची अष्टपैलू कामगिरी, कर्णधार अभिषेक पवारचा शतकी तडाखा आणि गिरीश बोचरे याची सुरेख गोलंदाजी या बळावर उस्मानाबाद संघाने नाशिक येथे सुरू असलेल्या एमसीएच्या १९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत सातारा संघावर एक डाव व १८७ धावांनी दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात गिरीश बोचरेने एकूण ७७ धावांत ९ बळी घेत विजयात निर्णायक योगदान दिले.

 Osmnabad's sounding victory | उस्मानाबादचा दणदणीत विजय

उस्मानाबादचा दणदणीत विजय

ठळक मुद्देएमसीए स्पर्धा : गिरीश बोचरेचे एकूण ९ बळी

औरंगाबाद : प्रथमेश पाटील याची अष्टपैलू कामगिरी, कर्णधार अभिषेक पवारचा शतकी तडाखा आणि गिरीश बोचरे याची सुरेख गोलंदाजी या बळावर उस्मानाबाद संघाने नाशिक येथे सुरू असलेल्या एमसीएच्या १९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत सातारा संघावर एक डाव व १८७ धावांनी दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात गिरीश बोचरेने एकूण ७७ धावांत ९ बळी घेत विजयात निर्णायक योगदान दिले.
प्रथमेश पाटीलच्या १६५ व अभिषेक पवारच्या १४८ धावांच्या बळावर उस्मानाबादने त्यांचा पहिला डाव ४ बाद ४६२ धावांवर घोषित केला. त्यानंतर गिरीश बोचरे व प्रथमेश पाटीलच्या सुरेख गोलंदाजीच्या बळावर उस्मानाबादने सातारा संघाचा पहिला डाव १४२ धावांत गुंडाळला. सातारा संघाकडून दिग्विजय जाधवने ४९ व अमन इनामदारने ३९ धावा केल्या. गिरीश बोचरेने १९ धावांत ५ व प्रथमेश पाटीलने २0 धावांत ४ गडी बाद केले. त्यानंतर उस्मानाबादने दुसऱ्या डावात फलंदाजी न करताना सातारा संघावर फॉलोआॅन लादत त्यांचा दुसरा डाव १३३ धावांत गुंडाळताना विजयावर शिक्कामोर्तब केला. सातारा संघाकडून दुसºया डावात अनंतकुमार शिंदेने ४३ धावा केल्या. उस्मानाबादकडून गिरीश बोचरेने ५८ धावांत ४ गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक
उस्मानाबाद (पहिला डाव) : ४ बाद ४६२ घोषित. सातारा (पहिला डाव) : सर्वबाद १४२. (दिग्विजय जाधव ४९, अमन इनामदार ३९. गिरीश बोचरे ५/१९, प्रथमेश पाटील ४/२0). दुसरा डाव : सर्वबाद १३३. (अनंतकुमार ४३, गिरीश बोचरे ४/५८).

Web Title:  Osmnabad's sounding victory