शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
3
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
4
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
5
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
6
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
7
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
8
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
9
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
10
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
11
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
12
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
13
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
14
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
15
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
16
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
17
दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे ॲटलीच्या 'राका'मध्ये दीपिका पादुकोणची सीन्स कट? मेकर्सने दिलं स्पष्टीकरण
18
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
19
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
20
ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता गरजेची; भारताने होर्मुझ संकटातून धडा घ्यावा, अनिल अग्रवाल यांचे सुचक विधान
Daily Top 2Weekly Top 5

ओमायक्रॉनची धास्ती ! औरंगाबादेत विदेशातून आलेल्या १८ जणांची आरटीपीसीआर; कर्नाटकातून येणाऱ्या वाहनांवर नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2021 14:18 IST

Omicron Variant Scare : कोरोनाच्या ओमायक्रॉन विषाणूचे रुग्ण शेजारच्या कर्नाटक राज्यात आढळून आले आहेत. त्यामुळे प्रशासनाने धास्ती घेतली आहे.

औरंगाबाद : कोरोनाच्या ( Corona Virus In Aurangabad ) ओमायक्रॉन विषाणूची धास्ती (Omicron Variant ) प्रशासनाने घेतली आहे. त्यामुळे १५ दिवसांत विदेशातून शहरात परतलेल्या २४ नागरिकांची कोरोना चाचणी केली जाणार आहे. त्यांपैकी दोघांची यापूर्वीच चाचणी केलेली आहे. गुरुवारी १८ जणांची विविध आरोग्य केंद्रात आरटीपीसीआर करण्यात आली ( RTPCR of 18 immigrants in Aurangabad ). तिघे बाहेरगावी गेले असून एकजण आज, शुक्रवारी चाचणी करणार आहे.

दरम्यान, कर्नाटककडून औरंगाबादकडे येणाऱ्या वाहनांवर प्रशासनाने नजर ठेवण्याची तयारी सुरू केली आहे. कोरोनाच्या ओमायक्रॉन विषाणूचे रुग्ण शेजारच्या कर्नाटक राज्यात आढळून आले आहेत. त्यामुळे प्रशासनाने धास्ती घेतली असून, बाहेरगावाहून विमानाने किंवा रेल्वेने येणाऱ्या प्रत्येकाची कोरोना चाचणी केली जाणार आहे. गेल्या १५ दिवसांत विदेशातून शहरात आलेल्या ३२ जणांपैकी २२ जण हे शहरातील रहिवासी आहेत. या नागरिकांची यादी जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त होताच महापालिकेने तातडीने या नागरिकांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला. या सर्वांशी आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मोबाईलवरून संपर्क साधून त्यांना आरोग्य केंद्रात बोलावले. २२ पैकी १८ जणांची कोरोनाची आरटीपीसीआर करण्यात आली. तिचा अहवाल शुक्रवारी प्राप्त होईल. यापूर्वी दोन विदेशी नागरिकांची चाचणी करण्यात येऊन त्यांचा अहवाल निगेटिव्ह आलेला आहे.

सोलापूर-धुळेवरून औरंगाबादकडेकर्नाटकमधील विजापूरमार्गे सोलापूर ते धुळे या महामार्गावरून येणारी वाहने औरंगाबादमार्गे जात आहेत. सोलापूर चेकपोस्टवर या वाहनांतील प्रवाशांचे स्क्रीनिंग होत आहे की नाही, याची माहिती जिल्हा प्रशासन घेत आहे. तसेच महामार्गावर कुठेही टोलनाक्यावर वाहन थांबत नाही; कारण फास्टटॅगमुळे बहुतांश वाहने सुसाट पुढे जात आहेत. शहरात ते कुठे थांबत आहेत की नाही, याची खातरजमा अद्याप होत नाही. त्यामुळे कर्नाटककडून येणाऱ्या वाहनांची तपासणी करण्याबाबत आज, शुक्रवारी निर्णय होणे शक्य आहे.

टॅग्स :Omicron Variantओमायक्रॉनAurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्या