ओम राजेंचा तक्रारी अर्ज फेटाळला

By Admin | Updated: September 25, 2014 00:53 IST2014-09-25T00:43:27+5:302014-09-25T00:53:57+5:30

उस्मानाबाद : तालुक्यातील खामगाव येथील मतदार यादीमध्ये दुरुस्ती करण्यासंदर्भात आ. ओम राजेनिंबाळकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती.

Om Raje's grievances rejected the application | ओम राजेंचा तक्रारी अर्ज फेटाळला

ओम राजेंचा तक्रारी अर्ज फेटाळला


उस्मानाबाद : तालुक्यातील खामगाव येथील मतदार यादीमध्ये दुरुस्ती करण्यासंदर्भात आ. ओम राजेनिंबाळकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. याप्रकरणी चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश नायब तहसीलदार (निवडणूक) यांना दिले होते. याप्रकरणी नायब तहसीलदारांनी सर्व संबंधितांची सुनावणी घेवून अहवाल सादर केला. मात्र संबंधित तक्रारदारांनी विहीत नमुन्यात आणि सक्षम अधिकाऱ्याकडे अर्ज दाखल केला नसल्याचे सांगत, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी तो फेटाळला आहे.
खामगाव ग्रामपंचायतीने २०१४ च्या नवीन मतदार यादीमध्ये बोगस नावे समाविष्ट केली असून, संबंधित व्यक्ती गावात वास्तव्यास नाहीत, अशी तक्रार करुन या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, तसेच बोगस नावे यादीतून वगळावीत अशी मागणी तक्रारदार ओम राजेनिंबाळकर यांनी केली होती. त्यावर गैरअर्जदार यांनी विधीज्ञांमार्फत म्हणणे दाखल केले. मतदार नोंदणी नियम १९६० मधील तरतुदीनुसार फॉर्म नं. ०७ मध्ये आक्षेप घेणे आवश्यक आहे.फॉर्म नं. ७ हा आक्षेप मतदार नोंदणी यांच्याकडे आवश्यक आहे. मात्र या प्रकरणात तक्रारदाराने जिल्हाधिकाऱ्यांकडे आक्षेप नोंदविला आहे. त्यामुळे सदरील आक्षेप विचारात घेवू नये, असे म्हटले होते. त्याचप्रमाणे मतदार नोंदणी नियम १३ नुसार ज्यांचे नाव संबंधित मतदार यादीमध्ये आहे असा व्यक्ती आक्षेप घेवू शकतो. मात्र तक्रारदार ओम राजे यांचे नाव मतदार यादीमध्ये नाही.
तसेच नियम ११ (ए) नुसार यादी लोकांच्या परिक्षणासाठी ठेवली जाते. नियम १२ अन्वये ३० दिवसात आक्षेप घ्यावा, असे नमूद आहे. मात्र आक्षेपकर्त्यांनी तसा कुठेही उल्लेख केलेला नाही. त्यामुळे सदरील तक्रारदाराने केलेला आक्षेप फेटाळण्यात यावा, असा युक्तीवाद बेरोजगारांच्या वकिलांनी केला. त्यानुसार सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार उस्मानाबाद यांनी दोन्ही बाजुंचा युक्तीवाद लक्षात घेवून ओम राजे यांचा तक्रारी अर्ज फेटाळला. तक्रारदारांनी सक्षम अधिकाऱ्यांकडे आक्षेप नोंदविला नाही. तसेच अर्ज दाखल करताना मतदार नोंदणी नियमातील तरतुदी व विहीत पद्धती अनुसरली नसल्याचा ठपका ठेवला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Om Raje's grievances rejected the application