शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

महा ई - सेवा केंद्रांना नोटिसा

By admin | Updated: July 10, 2016 01:05 IST

औरंगाबाद : बनावट जात प्रमाणपत्रे देण्याचे प्रयत्न केल्याप्रकरणी शहरातील काही महा ई-सेवा केंद्रांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

औरंगाबाद : बनावट जात प्रमाणपत्रे देण्याचे प्रयत्न केल्याप्रकरणी शहरातील काही महा ई-सेवा केंद्रांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. महा ई- सेवा केंद्रातील संचिकांची तपासणी न करणारे तहसील कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई होण्याची चिन्हे आहेत.महा ई- सेवा केंद्रांमधून बनावट जात प्रमाणपत्रे देणारे रॅकेट कार्यरत असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच खळबळ उडाली. पाटकर क्षत्रीय या इतर मागासवर्गीय (ओबीसी) संवर्गात मोडणाऱ्या जातीच्या महिलेला अनुसूचित जमातीचे (एससी), तर अनुसूचित जमाती (क) प्रवर्गात येणाऱ्या हटकर प्रवर्गातील एका महिलेस बेलदार या अनुसूचित जमाती (ब) प्रवर्गाचे प्रमाणपत्र देण्याचे प्रकार महा ई- सेवा केंद्राकडून केले जात असल्याचे ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणले होते. अर्जदारांनी सादर केलेल्या कागदपत्रांची कोणतीही शहानिशा न करता कैकाडी, माळी, जंगम, तेली, परीट, कलाल, वंजारी, धनगर, न्हावी, सुतार, शिंपी या जातींची प्रमाणपत्रे देण्याची प्रक्रिया या केंद्रांकडून सुरू होती. महा ई-सेवा केंद्रांकडून सादर केल्या जाणाऱ्या संचिका तहसील कार्यालय स्तरावर अव्वल कारकून, नायब तहसीलदार, तहसीलदार यांनी तपासणे गरजेचे होते; परंतु कसलीही तपासणी न करता अशा अनेक संचिका उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आल्या आहेत. अर्जदाराने सादर केलेले खोटे पुरावे खरे असल्याचे भासवून बनावट जात प्रमाणपत्र वितरित करण्याचे प्रयत्न महा ई- सेवा केंद्रांकडून सुरू होते. याप्रकरणी शहरातील पाच महा ई-सेवा केंद्रांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, त्यांचे परवाने रद्द करण्याच्या हालचाली सुरू आहेत. कागदपत्रांची तपासणी न करणाऱ्या नायब तहसीलदारांनाही उपविभागीय अधिकारी कार्यालयाने नोटिसा बजावल्या आहेत.