शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
2
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
3
Latest Marathi News LIVE: नसरापूर प्रकरण: विशेष सरकारी वकील म्हणून तीन नावांची शिफारस
4
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
5
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
6
Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
7
ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची जजनी मागितली माफी; अमेरिकेत नवा वाद, नेमकं कारण काय?
8
कैद्यांना मिळणारी पॅरोल आणि फर्लो रजा काय असते? कुणाला मिळू शकते, किती दिवस, नियम काय?
9
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
10
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
11
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
12
गेल्या ५० वर्षांत प. बंगालमध्ये झाले फक्त तीन मुख्यमंत्री; एकाची कारकीर्द २३ वर्षांहून जास्त! जाणून घ्या...
13
वय ६५ वर्षे तरी जोश भारी! तरुणांना लाजवेल असा वृद्धांचा फिटनेस फंडा; Video तुफान व्हायरल
14
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
15
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
16
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
17
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
18
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
19
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
20
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
Daily Top 2Weekly Top 5

"यंदा मेडिकलचे मेरिट वाढणार?" तज्ज्ञांकडून 'नीट'च्या सोप्या पेपरनंतर कट ऑफ वाढण्याचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 14:19 IST

'नीट'चा पेपर सुटला, विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद; फिजिक्स आणि केमिस्ट्रीने दिला दिलासा.

छत्रपती संभाजीनगर : वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी महत्त्वाची असलेल्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (नीट) शहरातील ५० केंद्रावर सुरळीतपणे रविवारी (दि.३) पार पडली. या परीक्षेला नोंदणी केलेल्या १७ हजार ३७४ विद्यार्थ्यांपैकी १६ हजार ९८६ जणांनी परीक्षा दिली. ३८८ विद्यार्थी गैरहजर होते. विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी दिलेल्या निर्धारित वेळेत केंद्रांमध्ये सोडण्यात आले. परीक्षा दिल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी काठीण्य पातळी सोपी असल्याची प्रतिक्रिया दिली. तज्ज्ञांनीही मागील वर्षीच्या तुलनेत पेपर सोपा असल्यामुळे वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचा ‘कट ऑफ’ वाढण्याची शक्यता वर्तविली आहे.

‘नीट’ परीक्षेसाठी देशभरातून लाखो विद्यार्थी बसले होते. छत्रपती संभाजीनगर शहरातील ५० केंद्रांवर परीक्षेसाठी १७ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. मागील वर्षी परीक्षेच्या दरम्यान गोंधळाची परीस्थिती होती. त्यामुळे सगळ्याच केंद्रांवर कडक पोलिस बंदोबस्त तैनात केला हाेता. विद्यार्थ्यांना केंद्रांवर सकाळी ११ वाजताचा रिर्पोटिग टाईम होता. त्यानुसार विद्यार्थी उपस्थित राहिले. केंद्रात प्रवेश देण्यापूर्वी विद्यार्थ्यांचे फेस रेकिगनेशन, थम घेऊनच प्रवेशपत्र व ओळखपत्रांची पडताळणी करत प्रवेश दिला. परीक्षा दिल्यानंतर केंद्राबाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. पेपर सोपा गेल्याची प्रतिक्रिया अनेक विद्यार्थ्यांनी दिली. सर्वाधिक अवघड वाटणारा फिजिक्सचा पेपर सोपा होता. त्याशिवाय केमिस्ट्रीही विद्यार्थ्यांना अवघड गेला नाही. बायलॉजी हा विषय तर विद्यार्थ्यांच्या आवडीचा असतो. मात्र, या विषयाचे प्रश्न वाचून उत्तर लिहिण्यासाठी वेळ लागल्याचेही काही विद्यार्थ्यांनी सांगितले.

उन्हात गारवा शोधण्याचा प्रयत्नअनेक केंद्रांवर विद्यार्थ्यांसाेबत त्यांच्या पालकांनीही गर्दी केली होती. केंद्राबाहेर बसलेल्या पालकांसाठी काही केंद्राबाहेर पंडाल टाकण्यात आला होता तर अनेक पालकांनी परिसरातील झाडांचा आधार घेत उन्हात गारवा शोधण्याचा प्रयत्न केला. अनेक पालकांनी पाल्य परीक्षा देऊन बाहेर येईपर्यंत केंद्राचा परिसर सोडला नव्हता. त्यामुळे अनेकांना उन्हाच्या झळा सहन कराव्या लागल्या. अनेक केंद्रांच्या बाहेर पिण्यासाठी पाणी उपलब्ध नसल्यामुळे पाणी बाटल्यांची शोधाशोध करताना काही पालक दिसले.

मागील वर्षीपेक्षा सोपा पेपरमागील वर्षीच्या 66 तुलनेत यावर्षीचा पेपर सोपा होता. तिन्ही विषयांतील अनेक प्रॉब्लेम सहजपणे सोडविता आले आहेत. त्यामुळे चांगले मार्क मिळण्याची अपेक्षा आहे.-निकिता लहाने, विद्यार्थिनी

बायोलॉजी सर्वांत सोपाबायोलॉजी 66 विषयाचे प्रश्न सोपे होते. केमिस्ट्री आणि फिजिक्स विषयाच्या प्रश्नांची काठिण्य पातळी ही मध्यम होती. हे प्रश्न सोडविताना अधिकचा वेळ लागला. तरीही मागील वर्षीच्या तुलनेत पेपर सोपा गेला आहे.-प्रतीक्षा मिरगे, विद्यार्थिनी

फिजिक्सही अपेक्षेपेक्षा सोपा66 फिजिक्सच्या काठिण्य पातळी मध्यम होती. ज्या विद्यार्थ्यांनी कन्सेप्टनुसार अभ्यास केला, त्यांचे मार्क वाढणार आहेत. मात्र, विद्यार्थ्यांना प्रश्न सोडविण्यासाठी अधिकचा वेळ लागला. अनेक विद्यार्थी त्यांचे अनुभव सांगत आहेत. त्यावरून 'कटऑफ'चा अंदाज लावता येऊ शकतो.- बी.एस. रेड्डी, फिजिक्स तज्ज्ञ

'नीट'चा पेपर मध्यम२०२३ साली ज्या 66 पद्धतीचा पेपर होता, त्या प्रकारचा पेपर यावेळी आला होता. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी कटऑफ १०० मार्कानी जास्त राहण्याची शक्यता आहे. केमिस्ट्री विषयाचे प्रश्नही मध्यम स्वरूपाचे होते. मात्र, हे प्रश्न सोडविण्यासाठी विद्यार्थ्यांना वेळ लागला.-प्रा. यशवंत चव्हाण, केमिस्ट्री तज्ज्ञ

English
हिंदी सारांश
Web Title : Easier NEET Exam: Medical Admission Cut-offs Likely to Rise This Year

Web Summary : NEET exam went smoothly across 50 centers. Experts predict higher medical admission cut-offs due to the easier paper. 16,986 students appeared, with physics deemed easier. Parents faced challenges due to heat and water scarcity outside centers.
टॅग्स :examपरीक्षाchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर