शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी काँग्रेसची गुगली

By admin | Updated: July 16, 2014 01:26 IST

संतोष धारासूरकर , जालना पाच पैकी तीन जागा हिश्यास असताना सुद्धा आणखी एका जागेसाठी प्रयत्न करणार असल्याचा दावा करीत ‘राष्ट्रवादीचे’ प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी इच्छुकांच्या आशा पल्लवित केल्या.

संतोष धारासूरकर , जालनाजिल्ह्यातील पाच पैकी तीन जागा हिश्यास असताना सुद्धा आणखी एका जागेसाठी प्रयत्न करणार असल्याचा दावा करीत ‘राष्ट्रवादीचे’ प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्वपक्षीय इच्छुकांच्या आशा पल्लवित केल्या. परंतु काँग्रेसजनांत अस्वस्थता पसरवली आहे. या जिल्ह्यात मुळातच कॉंग्रेस आघाडीत फारसे सख्य नाही. काँग्रेसजन समन्वयासह एकत्रीकरणाचे दर्शन, ऐक्याचे गोडवे गात आले आहेत. परंतु पडद्याआड काँग्रेसजनांत बेबनाव कायम राहिला आहे. अधूनमधून तो प्रगटसुद्धा झाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघ व लोकसभा निवडणुका काँग्रेसजनांनी एकत्रितपणे लढविल्या खऱ्या परंतु आघाडीअंतर्गत धुसफूस सदैव जाणवली. आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच काँग्रेसजनांत प्रत्यक्ष लढतीपूर्वी शीतयुद्ध सुरु होईल हे अपेक्षितच आहे. ती साहजिक प्रतिक्रिया सुद्धा आहे. मात्र खुद्द ‘राष्ट्रवादी’चे प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी या जिल्ह्याच्या दौऱ्यातून त्यास तोंड फोडले. ही गोष्ट राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावणारी ठरली आहे.या जिल्ह्यात घनसावंगी, बदनापूर व भोकरदन या तीन जागा आघाडीतून राष्ट्रवादीच्या, जालना व परतूर या दोन जागा काँग्रेसच्या हिश्यास आहे.दोन ठिकाणी राष्ट्रवादी व एका ठिकाणी काँग्रेसचे आमदार सत्तेवर आहेत. राजकीयदृष्ट्या तीन जागा राष्ट्रवादीच्या हिश्यात असताना आणखी एका जागेची मागणी म्हणजे तो राष्ट्रवादीचा वरचढपणाच आहे. परंतु खद्द प्रदेशाध्यक्षांनीच चौथ्या जागेचा प्रस्ताव सादर करा, अशी सूचना करीत मित्रपक्षांची डोकेदुखी वाढविली आहे.या दौऱ्यापासून जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चौथ्या जागेचा विषय चर्चेला येणार हे स्पष्ट आहे. पण ती चौथी जागा नेमकी कोणती? असा सवाल उपस्थित होतो आहे. कारण जालना विधानसभेतून काँग्रेस प्रतिनिधीत्व करीत आहे. त्यामुळे या जागेच्या मागणीसह सोडण्याचा विषय उद्भवत नाही. राहिला परतूर विधानसभा मतदार संघ. येथून काँग्रेस सलग तीन निवडणुकांतून पराभूत झाली.गेल्या निवडणुकीत अन्वरबापू देशमुख, त्या आधी कदीरबापू देशमुख व गोपाळराव बोराडे हे काँग्रेस जन पराभूत झाले. त्यामुळे या मतदार संघावर त्या निकषाच्या आधारेच ‘राष्ट्रवादी’स दावा ठोकता येईल हे खरे. परंतु गेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या सहकार्याने अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर आ. सुरेश जेथलिया यांनी काँग्रेसचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारल्याचे विसरता येणार नाही. त्याही पलिकडे काही वर्षांपासून ते काँग्रेसच्या तंबूतच वावरत आले आहेत. काँग्रेसच्याच वाटेवर आहेत. केवळ अधिकृत पक्षप्रवेश सोहळा बाकी आहे. त्यामुळेच सहयोगी सदस्य असणाऱ्या विद्यमान आमदाराची जागा काँग्रेसजन मित्रपक्षास म्हणजेच राष्ट्रवादीस सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी किंवा कार्यकर्त्यांकडून आग्रहपूर्वक मागणी करण्यात आली नसतानाही चौथ्या जागेच्या मुद्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.जागा मागणीचा प्रस्तावया पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांकडून स्थानिक पुढाऱ्यांना जागा मागणीचा प्रस्ताव सादर करण्याचा दिला जाणारा सल्ला आघाडीच्या धर्मास, ऐक्यास कितपत मानवणारा आहे, असा सवाल ज्येष्ठ काँग्रेसजनांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे आता आणखीन एका जागेसाठीचा राष्ट्रवादीने काढलेला विषय आघाडीत अस्वस्थता निर्माण करणारा ठरेल असे चित्र आहे.