शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
2
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
3
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
4
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
5
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
6
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
7
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
8
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
9
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
10
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
11
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
12
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
13
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
14
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
15
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
16
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
17
CSK vs MI: अवघ्या २१ धावांची खेळी, तरीही सूर्यकुमार यादवने मोडला किरॉन पोलार्डचा विक्रम
18
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
19
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
20
हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'
Daily Top 2Weekly Top 5

बिडकीनजवळील विषबाधेचे गूढ वाढले

By admin | Updated: May 25, 2014 01:31 IST

बिडकीन : बिडकीनजवळील बंगला तांडा येथे शुक्रवारी जुन्या माठातील पाणी प्यायल्याने एका मजूर महिलेचा मृत्यू झाला होता.

बिडकीन : बिडकीनजवळील बंगला तांडा येथे शुक्रवारी जुन्या माठातील पाणी प्यायल्याने एका मजूर महिलेचा मृत्यू झाला होता. तिच्या मृत्यूचे गूढ उकलण्याऐवजी वाढतच चालले आहे. शवविच्छेदन अहवालातही मृत्यूचे निश्चित कारण दिले नसल्याने विषबाधा नेमकी कशी झाली, याचे कोडे उकलण्याचे आव्हान बिडकीन पोलिसांपुढे उभे आहे. शुक्रवारी (२३ मे) दुपारी बंगला तांडा (ता. पैठण) येथील भीमा भालेकर यांच्या शेतात कांदे काढण्यासाठी गेलेल्या चार मजूर महिलांनी तेथील अडगळीत पडलेल्या जुन्या माठात विहिरीचे पाणी टाकून ते प्यायले होते. यानंतर काही वेळातच त्यांना त्रास जाणवू लागला. दुसर्‍या काही मजुरांनी त्या चार महिलांना बिडकीन येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. हा विषबाधेचा प्रकार असल्याचे लक्षात येताच चारही महिलांना तातडीने पुढील उपचारकामी घाटी दवाखान्यात पाठविले. त्यानंतर सायंकाळी पार्वताबाई राठोड (६५) या मजूर महिलेचा मृत्यू झाला, तर सीताबाई राठोड (४५), कमळाबाई आडे (६५), कलाबाई राठोड यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, पार्वताबाईचे शवविच्छेदन घाटी रुग्णालयात करण्यात आले; परंतु तिचा मृत्यू नेमका कशाने झाला, याचे डॉक्टरांनी निश्चित कारण अहवालात नमूद केले नसल्याने पोलीसही चक्रावले आहेत. डॉक्टरांनी मयताचा व्हिसेराही राखून ठेवला आहे. त्यामुळे बिडकीन पोलिसांनी सध्यातरी मयताच्या नातेवाईकांचा जाबजबाब घेणे सुरू केले आहे. अद्याप या प्रकरणी कोणीही तक्रार केली नसल्याचे जमादार पटारे यांनी सांगितले. मयत पार्वताबाईवर आज बंगला तांडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. (वार्ताहर)अडगळीत पडलेला तो माठही पोलिसांनी जप्त केला असून तोही छावणी प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवला जाणार आहे. या जुन्या माठाचा वापर पिकावरील कीटकनाशक फवारणीसाठी झाला असावा आणि त्यातच या महिलांनी पाणी भरले असावे, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. दरम्यान, जुना माठ शेतमालकाने नष्ट करायला हवा होता, अशी चर्चाही गावात सुरू आहे.