शहरं
Join us  
Trending Stories
1
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
2
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
3
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
4
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
5
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
6
ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री
7
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
8
देशातील पहिला पौराणिक ओटीटी प्लॅटफॉर्म 'Hari Om' सुरु करणार, Ulluचे मालक विभू अग्रवाल यांची घोषणा
9
"मुस्लिमशी लग्न केल्यानंतर अख्खी मुंबई...", तन्वी आजमींनी सांगितली 'ती' जुनी आठवण
10
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
11
धक्कादायक! कार चालवताना चालकाची अचानक तब्येत ढासळली; ड्रायव्हिंग शीटवर जीव सोडला
12
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
13
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
14
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला
15
तिरडीवर बसून निवडणूक अर्ज भरायला पोहचला उमेदवार; स्मशानभूमीत उघडलं कार्यालय
16
Income Tax विभागानं सुरू केली नवी सुविधा, कोट्यवधी लोकांना होणार 'हा' फायदा
17
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
19
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
20
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं

महापालिकेच्या शाळा शिक्षणसम्राटांच्या घशात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2020 9:33 PM

भाजपने रचला पाया, तर शिवसेनेने गाठला कळस

ठळक मुद्दे: भाजपने रचला पाया, तर शिवसेनेने गाठला कळसएकमेकांचे हात दगडाखाली

औरंगाबाद : महापालिकेच्या शाळा शिक्षणसम्राटांच्या घशात घालण्याचा सपाटा सुरू झाला आहे. आधी भाजपच्या महापौरांनी यासाठी पाया रचला तर शिवसेना महापौरांच्या काळात त्याचा कळस गाठण्याचा प्रकार गुरुवारी सर्वसाधारण सभेत समोर आला. एकमेकांचे हात दगडाखाली अडकविणाऱ्या या प्रकरणामुळे दोन्ही पक्षांची राजकीय कोंडी आज पाहायला मिळाली.

माजी महापौर भगवान घडमोडे यांनी मनपाची शाळा भाड्याने देण्याचा प्रस्ताव गुपचूप मंजूर केल्याचे प्रकरण ते पदावरून पायउतार झाल्यानंतर उघडकीस आले होते. आता विद्यमान महापौर नंदकुमार घोडेले यांच्या काळात दोन शाळांच्या जागा खासगी शिक्षणसंस्थांना भाड्याने देण्याचा प्रस्ताव सभेत समोर न येताच, मंजूर केल्याने आर्थिक व्यवहाराचा आरोप भाजपचे गटनेते प्रमोद राठोड यांनी गुरुवारी केला. यातून शिवसेना विरुद्ध भाजप असे वाक्युद्ध पेटले आहे. 

पालिकेच्या शाळांमध्ये सामान्य घटकांतील विद्यार्थी शिकतात. मनपाच्या अनेक शाळांच्या जागांचे क्षेत्रफळ मोठे आहे. त्या जागांची देखभाल करणे शक्य नाही. शाळा मोडकळीस आल्याचे दाखवून खासगी संस्थांच्या घशात शाळा घातल्या जात आहेत. आयुक्त बदलताच सिडको एन-६ येथील शाळा ३० वर्षांच्या भाडेकरारावर साई नॉलेज सोल्युशन्स संस्थेला तर एन-९ येथील शाळा जनक्रांती शिक्षण प्रसारक मंडळाला देण्याचा ठराव ७ जानेवारीच्या सभेसमोर न येताच मंजूर करण्यात आला आहे. 

हा प्रस्ताव सभेत चर्चेसाठी आलाच नाही. शिवसेनेचे मनोज बल्लाळ यांच्या प्रस्तावास भाजपचे रामेश्वर भादवे यांनी अनुमोदन दिले. दरम्यान भादवे यांनी मला कल्पना न देताच स्वाक्षरी घेण्यात आल्याचे सांगून हात वर केले. तर एन-९ येथील शाळेसंदर्भात सेनेच्याच ज्योती पिंजरकर यांच्या प्रस्तावास रावसाहेब आम्ले यांनी अनुमोदन दिले. हे दोन्ही विखंडित करण्यासाठी शासनाकडे पाठविण्याची मागणी राठोड यांनी आयुक्तांकडे केली. मात्र त्यांनी भाजपच्या काळात मंजूर झालेल्या प्रस्तावाबाबत काही प्रतिक्रिया दिली नाही.

हा भाजपने पाडलेला ‘आदर्श’ पायंडाशाळा भाड्याने देण्याचा ‘आदर्श’ पायंडा भाजप महापौरांच्या काळात पडला. त्यावर भाजप गटनेते गप्प का बसले आहेत. माझ्यासमोर नगरसेवकांचा प्रस्ताव आला होता. त्यावर नियमानुसार कारवाईचे आदेश दिलेले आहेत.भाजपच्या काळात भाड्याने दिलेली शाळा परत घेण्याची मागणी भाजप नगरसेवक का करीत नाहीत. आपले ठेवायचे झाकून असा प्रकार भाजपने करू नये. नियमात जे असेल ते होईल. भाजपनेदेखील त्यांच्या काळात ज्या शैक्षणिक संस्थेला जागा दिली, ती परत घेण्याची मागणी करावी, असे महापौर नंदकुमार घोडेले म्हणाले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाEducationशिक्षण