शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

महानगरपालिकेचे कामकाज ठप्प

By admin | Updated: July 16, 2014 00:47 IST

परभणी: राज्यातील तीन महानगपालिकांसह २२५ नगरपालिकेतील कर्मचारी सोमवारपासून आपल्या विविध मागण्यांसाठी संपावर गेले आहेत.

परभणी: राज्यातील तीन महानगपालिकांसह २२५ नगरपालिकेतील कर्मचारी सोमवारपासून आपल्या विविध मागण्यांसाठी संपावर गेले आहेत. परभणी मनपातील कर्मचारीही या संपात सहभागी झाल्याने मनपाचे कामकाज दिवसभर ठप्प झाले होते.वेतनासह कर्मचाऱ्यांच्या इतर अनेक प्रश्नांसाठी महाराष्ट्र राज्य नगरपरिषद कर्मचरी संवर्ग अधिकारी संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला होता. परंतु शासनाने यावर कुठलीही कारवाई केली नाही. त्यामुळे राज्यातील पालिका कर्मचाऱ्यांनी पहिल्या टप्प्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे काढले होते. या आंदोलनाचीही दखल घेतली गेली नाही, त्यामुळे १५ जुलैपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात आला.या आंदोलनात परभणी, लातूर आणि चंद्रपूर या महानगरपालिकेसह राज्यातील २२५ नगरपालिकांमधील कर्मचारी सहभागी झाल्याची माहिती कामगार नेते के. के. आंधळे यांनी दिली. हा संप संघटनेचे संस्थापक के. के. आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राज्याध्यक्ष विश्वनाथ घुगे व संघटनेचे सरचिटणीस रामेश्वर वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आला आहे.संपात ९० टक्के कर्मचारी सहभागी झाल्याचा दावा संघटनेने केला आहे.(प्रतिनिधी)सर्व कर्मचारी संपात सहभागीपरभणी शहर महानगरपालिकेतील सर्व कर्मचारी या संपात सहभागी झाल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले. आज सकाळपासूनच परभणी मनपाच्या आवारात टेंट टाकून कर्मचाऱ्यांनी संपाला सुरुवात केली. हा संप यशस्वीतेसाठी आनंद मोरे, राजन क्षीरसागर, मुक्तसीद खान, गणेश सुरवसे, चंद्रकांत पवार, भारसाकळे, अनुसयाबाई जोगदंड, आयुब खान, एस.एस. पालकर, लिंबाजी बनसोडे, मनोज तळेकर, राजू कामखेडे, राजू मोरे, डी.बी. देवकर, सतीश राऊत आदींनी परिश्रम घेतले.अशा आहेत मागण्या महानगरपालिका व नगरपालिका कर्मचाऱ्यांचे व सेवानिवृत्त कमचाऱ्यांच्या वेतनासाठी १०० टक्के अनुदान द्यावे, १० मार्च १९९३ नंतरच्या कर्मचाऱ्यांना विनाअट कायम सेवेत सामावून घ्यावे, अनुकंपाधारकांना सेवेत सामावून घ्यावे, १२ १४ वर्षांची कालबद्ध पदोन्नती कर्मचाऱ्यास लागू करावी, शासनाच्या निर्णयानुसार नगरपालिका संवर्गात समावेशन झालेल्या कर्मचाऱ्यांचे सेवाउपदान कोषागारात जमा करावे, नगरपालिका संवर्गात अतिरिक्त झालेल्या कर्मचायांना त्वरीत पदस्थापना देण्यात यावी, ३८ नगरपालिकांचे थकीत सहायक अनुदान फरकाची रक्कम त्वरीत वितरित करावी, परभणी महानगरपालिकेचे बंद केलेले सहायक अनुदान सुरू करावे, उपलोक आयुक्त यांना दिलेल्या निर्णयानुसार वेतन व सेवानिवृत्त वेतनासाठी १४.८लाख रुपयांचा प्रस्ताव मान्य करावा आदी मागण्यांचा समावेश आहे.कामकाज ठप्पकर्मचाऱ्यांनी संपाला सुरुवात केल्यामुळे सोमवारी दिवसभर कुठलेही कामकाज झाले नाही. त्यामुळे नागरिकांची कामे खोळंबली. महत्त्वाचे प्रमाणपत्र, दाखले काढण्यासाठी मनपात येणाऱ्या नागरिकांना रिकाम्या हाताने परतावे लागले.