आॅपरेटर्सचे आंदोलन चिघळणार

By Admin | Updated: December 5, 2014 00:54 IST2014-12-05T00:24:30+5:302014-12-05T00:54:42+5:30

बीड : संग्राम कक्षांतर्गत कार्यरत असलेल्या आॅपरेटर्सनी पुकारलेल्या कामबंद आंदोलनानंतर काहींना कारणे दाखवा नोटिसा आल्या आहेत़

The movement of the operators will get annoyed | आॅपरेटर्सचे आंदोलन चिघळणार

आॅपरेटर्सचे आंदोलन चिघळणार


बीड : संग्राम कक्षांतर्गत कार्यरत असलेल्या आॅपरेटर्सनी पुकारलेल्या कामबंद आंदोलनानंतर काहींना कारणे दाखवा नोटिसा आल्या आहेत़ आॅपरेटर्सनी आता ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला असून त्यामुळे आंदोलन चिघळण्याच्या मार्गावर आहे़
जिल्ह्यात ९५० हून अधिक आॅपरेटर्स कार्यरत आहेत़ या आॅपरेटर्सपैकी ७०० आॅपरेटर्स २८ नोव्हेंंबरपासून विविध प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी संपावर गेले आहेत़ मात्र, आॅपरेटर्सनी संपाचे हत्यार उपसताच आता महाआॅनलाईन कंपनीने आॅपरेटर्सना कारणे दाखवा नोटीस बजावण्यास सुरुवात केली आहे़
त्यामुळे आॅपरेटर्सचे प्रश्न सोडणे तर दूरच;पण त्यांनाच वेठीस धरले जात असल्याचा आरोप आॅपरेटर्स कामगार संघटनेने केला आहे़ आॅपरेटर्सना आंदोलनात सहभागी झाल्यामुळे कामावरुन कमी करण्याचा घाट घातला जात असून याविरुद्ध आवाज उठविण्यासाठी सीईओंच्या दालनापुढे ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा धोंडीराम बांगर, अतुल शिंदे, दत्ता तांबे, नारायण गीते, अमोल येवले यांनी गुरुवारी दिला़
काय आहेत मागण्या?
सेवेत कायम करावे, जाचक नियम रद्द करावेत, पगारवाढ द्यावी, इंटरनेट बिल अदा करण्याच्या सूचना ग्रामसेवकांना द्याव्यात, थकित वेतन अदा करावे, ८ हजारांप्रमाणे वेतन द्यावे, प्रवास भत्ता द्यावा आदी मागण्यांसाठी आॅपरेटर्सचा लढा आहे़ (प्रतिनिधी)४
संग्राम प्रकल्पांतर्गत ग्रामपंचायत स्तरावर महाआॅनलाईन कपंनीकडून नेमलेल्या आॅपरेटर्सच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या कार्यासन अधिकारी अर्चना वालझाडे यांनी १ डिसेंबर रोजी सीईओंना पत्र पाठवून संपूर्ण माहिती मागविली आहे़ किती आॅपरेटर्स आंदोलनात सहभागी आहेत?, आॅपरेटर्सनी केलेल्या कामांचा लेखाजोखा याच्या तपशीलवार माहितीचा अहवाल मागविण्यात आला आहे़

Web Title: The movement of the operators will get annoyed