शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

‘आईला संस्कृतीचा विसर पडतोय’

By admin | Updated: July 7, 2014 00:09 IST

माजलगाव: आज घरातील आईमधील आई संपून तिची ‘मम्मा’ झाल्याने हिंदू संस्कृतीचा ऱ्हास होत चालला आहे.

माजलगाव: आज घरातील आईमधील आई संपून तिची ‘मम्मा’ झाल्याने हिंदू संस्कृतीचा ऱ्हास होत चालला आहे. टीव्हीच्या नादाने खुद्द आईलाच संस्कृतीचा विसर पडल्याने घराला घरपण राहिले नसून, आता धर्मसंस्कृती टिकविण्यासाठी घरातील वडीलधाऱ्यांची आदरयुक्त भीती घरावर राहिली पाहिजे, असे रोखठोक प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अ‍ॅड. अपर्णा रामतीर्थकर यांनी केले.माजलगाव येथे शनिवारी ‘नाती जपू या’ या विषयावर महिलांसाठी खास व्याख्यान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी सोलापूरच्या अ‍ॅड. रामतीर्थकर यांनी उपस्थित हजारो महिलांना मार्गदर्शन केले. त्या पुढे म्हणाल्या, आई म्हणून कुटुंब प्रमुख आहे. दीर, भावजई, सासू, सासरे, नणंद, मुले ही सर्व नाते जपण्याचे काम आईचे आहे. परंतु आज टीव्हीमधील मालिकांचे वेड आईलाच लागल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कुटुंबाकडे तर दुर्लक्ष तर होतेच आहे. परंतु ती हिंदू संस्कृतीही विसरली असल्याची खंतही अ‍ॅड. अपर्णाताई यांनी व्यक्त केली. कपाळाला कुंकवाची टिकली, हातातील बांगड्या गायब झाल्या, अंगात टॉप व जीन्स आली आता तेच अनुकरण मुली करीत आहेत. आईच संस्कार विसरल्याने घरात घरपण राहिले नाही. संस्कृती बदलत चालल्याने येणाऱ्या काही वर्षात महिलांना अनेक संकटांचा सामना करावा लागेल, अशी भीतीही त्यांनी उपस्थित महिला, पुरुषांना मार्गदर्शन करताना व्यक्त केली. आईने आपली संस्कृती जपून आपल्या मुलांवर व इतरांवर चांगले संस्कार कसे घडतील? यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. या व्याख्यानासाठी महिला, पुरुष, तरुण मुले-मुली यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. रामतीर्थकर यांनी महिलांचे व्याख्यानातून प्रबोधन केले. (वार्ताहर)