शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत व्यक्तींकडून औषधांची सर्रास विक्री

By admin | Updated: July 7, 2014 00:09 IST

गढी : गेवराई तालुक्यातील गढीसह सिरसदेवी, पाडळसिंगी, मादळमोही येथील काही मेडिकलवर अनधिकृत व्यक्तींकडूनच औषध विक्री होत असल्याचे दिसून येत आहे.

गढी : गेवराई तालुक्यातील गढीसह सिरसदेवी, पाडळसिंगी, मादळमोही येथील काही मेडिकलवर अनधिकृत व्यक्तींकडूनच औषध विक्री होत असल्याचे दिसून येत आहे. औषध विक्रीचा परवाना फार्मासिस्टच्या नावे असला तरीही अनधिकृत व्यक्ती रुग्णांना औषध विकत असल्याने रुग्णांच्या जीवाला धोका होण्याची शक्यता आहे.गढी, सिरसदेवी, मादळमोही, पाडळसिंगी या ठिकाणी काही औषधी दुकाने आहेत. औषधी दुकानांसाठी औषध निर्माणशास्त्रातील तज्ज्ञ (फार्मासिस्ट) असणे आवश्यक आहे. असे असले तरी काही ठिकाणी औषध दुकानाचा परवाना फार्मासिस्टच्या नावे आहे. मात्र ती दुकाने संबंधित डॉक्टरचे नातेवाईक किंवा इतरच व्यक्ती चालवित असल्याचे दिसून येत आहे.मेडिकलमध्ये फ्रीजसह इतर साधने व पुरेशी जागा आवश्यक असताना काही ठिकाणी अत्यंत छोट्या जागेत मेडिकलसह जनरल स्टोअर्स चालविले जातात. गांभीर्याची बाब म्हणजे काही बीएचएमएस डॉक्टरांच्या रुग्णालयाजवळच मेडिकल दुकाने आहेत. येथून अनधिकृत व्यक्ती औषधी विक्री करत असल्याने रुग्णांच्या जिवास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे अशी अनधिकृत व्यक्तीकडून होणारी औषध विक्री तत्काळ बंद करावी, अशी मागणी रुग्णांसह नातेवाईकांकडून केली जात आहे.याबाबत औषधी निरीक्षक चांडक म्हणाले की, अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाई करण्यात येत आहे. लेखी तक्रार असल्यास पुन्हा कारवाई करु. (वार्ताहर)गेवराई तालुक्यातील गढीसह पाडळसिंगी, मादळमोही, सिरसदेवी येथील काही मेडिकलवर होत आहे अनधिकृत व्यक्तींकडून औषध विक्रीमेडिकल दुकानांमध्येही फ्रीजसह इतर साधनांचा अभाव