शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: पश्चिम बंगालमध्ये भाजपा सरकार स्थापन करणार; ममता बॅनर्जींसोबत 'खेला होबे'
2
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
3
Success Story: एकेकाळी काँक्रिटच्या जमिनीवर झोपायचे लक्ष्मी मित्तल; आता ₹२७०००० कोटींची नेटवर्थ, IPL टीमचेही बनले मालक
4
बंगालमध्ये बाबरी मशीद बांधणारे हुमायूं कबीर २ जागांवर लढत होते, निकालात त्यांचे काय झाले?
5
Airplane Accident: लँडिंग करतानाच विमानाची ट्रकला धडक; न्यूयॉर्क विमानतळाजवळील घटनेचा व्हिडीओ बघा
6
Baramati Result 2026: सुनेत्रा पवारांना रेकॉर्डब्रेक मतदान; अजित पवारांचा विक्रम मोडत जादुई आकडा पार, एकतर्फी विजयाच्या दिशेने वाटचाल
7
ममता बॅनर्जी वि. सुवेंदू अधिकारी...! भवानीपूरमध्ये आतापर्यंत सात फेऱ्या झाल्या, प्रत्येक फेरीचा निकाल आला...
8
'तीन'वरून ७७ वर आणि आता थेट १९०+ आमदार! भाजपाचा थक्क करणारा 'सक्सेस रेट'; पश्चिम बंगालमध्ये कसं फुललं 'कमळ'
9
असह्य वेदना पण लेकाने शिकावं ही एकच इच्छा; माऊलीचा 'हा' Video पाहून पाणावतील डोळे
10
तृणमूल काँग्रेस पराभवाच्या उंबरठ्यावर, ममता बॅनर्जी हताश, पण सोडली नाही विजयाची आस, कार्यकर्त्यांना केलं असं आवाहन
11
पाकिस्तानने संधीचं सोनं केलं! इराणच्या मजबुरीचा फायदा घेत खोऱ्यानं पैसा ओढला; आता पडणार नोटांचा पाऊस!
12
Numerology: 'या' जन्मतारखेचे लोक असतात अति संवेदनशील; सभोवतालच्या वातावरणाचा खोलवर होतो परिणाम
13
थलापती विजयचे राज्यभरात ८५ हजार फॅन क्लब्स; TVK च्या विजयात निभावली सर्वात मोठी भूमिका
14
आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा
15
केरळमध्ये 'या' पक्षाने अवघ्या २७ जागा लढवल्या, त्यातील २३ जागांवर पुढे; २१ उमेदवार मुस्लीम
16
Thalapathy Vijay Net Worth: अभिनेता ते राजकारणी; ६०० कोटींपेक्षा अधिकचं साम्राज्य, कशी आहे थलापति विजय यांची लक्झरी लाईफ 
17
लग्नानंतर सासरची पायरी चढण्याआधीच मोडला संसार! २०० रुपयांच्या नोटेमुळे नवरदेवाचा असा झाला भांडाफोड
18
तीन राज्यं जिंकली, पण दोन राज्यांत भाजपाची निराशा; भोपळा फोडला, पण हवं तसं 'कमळ' फुलेना!
19
दाक्षिणात्य सुपरस्टार विजयला 'थलापती' का म्हणतात? जाणून घ्या ३२ वर्षे जुनी कहाणी!
20
IPL 2026: RCBला मोठा धक्का! तुफान घोडदौड सुरू असताना स्टार खेळाडू संघ सोडून घरी परतला
Daily Top 2Weekly Top 5

मनपाच्या जलवितरण यंत्रणेतच दोष!

By admin | Updated: May 8, 2014 00:16 IST

औरंगाबाद : महापालिकेच्या प्रभागनिहाय जलवितरण यंत्रणेतच दोष असल्याचे स्पष्ट झाले आहे.

औरंगाबाद : महापालिकेच्या प्रभागनिहाय जलवितरण यंत्रणेतच दोष असल्याचे स्पष्ट झाले आहे. जायकवाडीतून कधी नव्हे ते १५६ एमएलडी पाणी उपसण्यापर्यंत मनपाच्या यांत्रिकी विभागाने मजल मारली आहे. तेवढे पाणी शहरापर्यंत येत नसल्यामुळे अडचण निर्माण होत आहे. १३६ एमएलडी पाणी शहरातील ५८ जलकुंभांपर्यंत पोहोचत आहे. शहरातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे, तर दुसरीकडे जायकवाडी ते औरंगाबाद शहरापर्यंत येणार्‍या दोन जलवाहिन्यांतून सुमारे २० एमएलडी पाण्याची गळती होत आहे. ही गळती आहे, की पाण्याची चोरी हा संशोधनाचा विषय आहे; मनपाच्या जलउपसा केंद्रापर्यंत पाण्याचा प्रवाह येण्यासाठी अ‍ॅप्रोच चॅनलचे काम गतवर्षी दुष्काळात करण्यात आले. त्यामुळे उपसा केंद्रापर्यंत पाण्याचा साठा मुबलक प्रमाणात आहे. तेथून दररोज १५० ते १५६ एमएलडी पाणी उपसले जात आहे. मात्र, शहरापर्यंत पोहोचेपर्यंत त्यातील २० एमएलडी पाणी मध्येच गळते आहे. वितरणातील दोष असा... धरणातून रोज १५० एमएलडी पाणी उपसले जाते. १५ कोटी लिटरचा तो आकडा आहे. १३ लाख लोकसंख्येला ते पाणी प्रति व्यक्ती १२० लिटरप्रमाणे पुरू शकते. मात्र, २० एमएलडी पाणी चोरी किंवा गळतीमध्ये जाते. शहरातील जलकुंभ एकाच वेळी भरण्यातही अनेक अडचणी येत आहेत. ७० टक्के जलकुंभ अर्धेही भरत नाहीत. दरडोई १३५ लिटर पाणी देणे मनपाला बंधनकारक आहे. मनपा सध्या ७८ लिटर पाणी दरडोई देत आहे. वर्षातून चार महिने पाणीपुरवठा होत असून, दरडोई १४ हजार लिटर पाणीपुरवठा मनपा करते. ३६५ दिवसांसाठी ३ हजार ५० रुपये पाणीपट्टी वसूल केली जात असून, १२० दिवस वर्षातून तर महिन्यातून १० दिवस पाणीपुरवठा होतो. १५ जुलैपर्यंत जिवंत जलसाठा जायकवाडी धरणात सध्या १०.७८ टक्के पाणीसाठा आहे. १५ जुलैपर्यंत तो साठा पुरेल. अ‍ॅप्रोच चॅनलमुळे ४५० मीटरपर्यंत पाणी खाली गेले तरी अडचण येणार नाही. जलउपसा केंद्रातील १४०० मि. मी. व्यासाच्या जलवाहिनीवरील ५ आणि ७०० मि. मी. व्यासाच्या जलवाहिनीवरील ३, असे ८ पंप पाणी उपसत आहेत, असे उपअभियंता यू. जी. शिरसाठ, के. एम. फालक यांनी सांगितले. पाण्याचे प्रेशरही बर्‍यापैकी असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पूर्ण क्षमतेने पंपिंग होत आहे. असा होतो पाणीपुरवठा शहराला जायकवाडीतून १५६ आणि हर्सूल तलावातून ५ एमएलडी पाणीपुरवठा होत आहे. दररोज १६१ एमएलडी पाणीपुरवठा ५८ जलकुंभांपर्यंत होतो. १९७२ साली ७०० मि़ मी़ आणि १९९२ साली टाकलेल्या १४०० मि़ मी़ जलवाहिनीतून शहराला पाणी येते. या दोन्ही जलवाहिन्या जीर्ण झाल्या आहेत़ टँक रच्या २७५ फेर्‍या ११८ पैकी ७० गुंठेवारी वसाहतींमध्ये टँकरने पाणीपुरवठा होतो. एन-७, एन-५, कोटला कॉलनी येथून टँकर भरले जातात. दररोज २७५ टँकरच्या फेर्‍या होतात. ३ हजार रुपये एका वर्षाला दिवसाआड पाणीपुरवठ्यासाठी मनपा आकारते. त्यातून दिवसाआड २०० लिटरचा १ ड्रम पाणी दिले जाते. गेल्या वर्षी २ हजार रुपये दर होता.