MIM नगरसेवक मतीन पटेल कोंडीत! निदा खान थांबलेल्या घरासह कार्यालयाला मनपाची 'नोटीस'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 18:37 IST2026-05-11T18:35:52+5:302026-05-11T18:37:51+5:30

मतीन पटेल यांच्यावर आता अपात्रतेची टांगती तलवार; मनपाने नाेटीसमध्ये काय म्हटले ?

MIM corporator Matin Patel in a dilemma! Municipal Corporation 'notice' to the house and office where Nida Khan stayed | MIM नगरसेवक मतीन पटेल कोंडीत! निदा खान थांबलेल्या घरासह कार्यालयाला मनपाची 'नोटीस'

MIM नगरसेवक मतीन पटेल कोंडीत! निदा खान थांबलेल्या घरासह कार्यालयाला मनपाची 'नोटीस'

छत्रपती संभाजीनगर : एमआयएम पक्षाचे नगरसेवक मतीन पटेल यांच्या नारेगावातील घरातून आरोपी निदा खानला गुरुवारी अटक करण्यात आली. शनिवारी महापौर समीर राजूरकर यांच्या आदेशानुसार पटेल यांच्या घराला नोटीस चिटकवण्यात आली. त्यामध्ये प्लॉटच्या मालकी हक्काचे कागदपत्र, बांधकाम परवानगी तीन दिवसांत सादर करावी, असे म्हटले आहे. कागदपत्र सादर न केल्यास इमारत अनधिकृत असल्याचे समजून पाडण्यात येईल, असा इशाराही दिला आहे.

नाशिकच्या टीसीएस कंपनीत काम करणारी निदा खान महिलांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करीत होती, असा आरोप आहे. तिच्यावर नाशिक पोलिसांनी गुन्हा नोंदविला. गत काही दिवसांपासून ती फरार होती. निदा खान छत्रपती संभाजीनगर शहरातील नारेगावात थांबल्याची माहिती नाशिक आणि स्थानिक पोलिसांना मिळाली. दोन दिवसांपूर्वी संयुक्त कारवाई करीत पोलिसांनी निदाला नारेगावातील एका घरातून अटक केली. हे घर एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांचे असल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी त्यांनाही आरोपी केले. एमआयएमचे सर्वेसर्वा खा. असदुद्दीन ओवैसी आणि प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी हे सर्व प्रकरण मीडिया ट्रायल असल्याचे सांगून टाकले. निदा खान निर्दोष सिद्ध होईल, असा दावाही केला.

दरम्यान, भाजपचे महापौर समीर राजूरकर यांनी मतीन पटेल यांच्या घराची संपूर्ण माहिती घ्यावी, असे प्रशासनाला निर्देश दिले. घर अनधिकृत असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले. त्यामुळे दुपारी अतिक्रमण हटाव विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घराला नोटीस चिटकवली. त्यामुळे या भागात एकच खळबळ उडाली आहे.

नाेटीसमध्ये काय म्हटले ?
मतीन पटेल यांच्या मालकीचे घर नारेगाव भागातील बिस्मिल्ला कॉलनीत आहे. नोटीसमध्ये नमूद केले आहे की, प्लॉट क्रमांक २ येथे सहा खोल्यांचे बांधकाम आहे. त्यात काही दुकाने बांधून त्याचा वाणिज्य वापरही सुरू केला. संपूर्ण बांधकाम अनधिकृत आहे. बांधकाम पाडून टाकण्यापूर्वी आपले म्हणणे तीन दिवसांत सादर करावे. उत्तर दाखल न केल्यास निकाल एकतर्फी काढण्यात येईल.

घर अनधिकृत असेल तर...
मतीन पटेल यांनी मनपा निवडणूक लढविताना शहरात माझ्या नावावर कुठेही अनधिकृत बांधकाम नाही, असे शपथपत्र सादर केले आहे. आता त्यांच्या नावावर हे अनधिकृत असल्याचे सिद्ध झाल्यास अपात्रतेची दुसरी नवीन टांगती तलवार येईल.

नारेगावातील कार्यालय अनधिकृत? मनपाकडून आणखी एक नोटीस
नगरसेवक मतीन पटेल यांचा नारेगावातील १८०० चौरस फुटांचा प्लॉट असून, चारही बाजूंनी वॉल कंपाउंड केले आहे. या जागेत त्यांनी कार्यालयही उभारले. संबंधित कार्यालयदेखील अनधिकृत असल्याचा सुगावा महापालिकेला लागल्यानंतर रविवारी रात्री उशिरा महापालिकेच्या पथकाने कार्यालयाला आणखी एक नोटीस चिकटवली.

Web Title : MIM पार्षद मतीन पटेल मुश्किल में: अवैध निर्माण के लिए नोटिस

Web Summary : एमआईएम पार्षद मतीन पटेल की मुश्किलें बढ़ीं, पुलिस ने उनके घर से निदा खान को गिरफ्तार किया। नगर निगम ने उनके घर और कार्यालय में अवैध निर्माण के लिए नोटिस जारी किया, तीन दिनों के भीतर संपत्ति के दस्तावेज मांगे, नहीं तो विध्वंस होगा। अवैध साबित होने पर पटेल को अयोग्य ठहराया जा सकता है।

Web Title : MIM Corporator Matin Patel in Trouble: Notice for Illegal Construction

Web Summary : MIM corporator Matin Patel faces scrutiny after police arrested Nida Khan from his house. The municipal corporation issued notices regarding illegal construction at his residence and office, demanding property documents within three days or face demolition. Patel may face disqualification if the properties are proven illegal.