रॉकेल ओतून विवाहितेला पेटविले

By Admin | Updated: May 16, 2014 00:18 IST2014-05-15T23:46:06+5:302014-05-16T00:18:21+5:30

हिंगोली : घरगुती कारणावरून एका विवाहितेच्या अंगावर रॉकेल ओतून जीवे मारण्याच्या उद्देशाने तिला पेटवून देण्यात आल्याने ती ६३ टक्के भाजली आहे.

Married to a kerosene | रॉकेल ओतून विवाहितेला पेटविले

रॉकेल ओतून विवाहितेला पेटविले

हिंगोली : घरगुती कारणावरून एका विवाहितेच्या अंगावर रॉकेल ओतून जीवे मारण्याच्या उद्देशाने तिला पेटवून देण्यात आल्याने ती ६३ टक्के भाजली आहे. डोणवाडा येथे ३ मे रोजी संध्याकाळी ही घटना घडली असून या प्रकरणी गुरूवारी पतीसह तीन आरोपींविरूध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला. वसमत तालुक्यातील डोणवाडा येथे ३ मे रोजी संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास आश्विनी गणेश ढाकरे (वय २५) या विवाहितेच्या राहत्या घरी घरगुती कारणावरून सासरच्या मंडळींनी तिच्या अंगावर रॉकेल टाकले. त्यानंतर जळती काडी अंगावर टाकून सदरील विवाहितेच्या अंगावर जीवे मारण्याच्या उद्देशाने पेटवून दिले. यात ६३ टक्के जळाल्याने आश्विनी ढाकरे या विवाहितेला उपचारासाठी सुरूवातीला वसमत येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. पुढील उपचारासाठी तिला नांदेडच्या सरकारी दवाखान्यामध्ये हलविण्यात आले. दरम्यान, तिची प्रकृती स्थिर असून दवाखान्यात नोंदवलेल्या तिच्या जवाबावरून या प्रकरणी १५ मे रोजी आरोपी गणेश संभाजी ढाकरे (पती), गयाबाई संभाजी ढाकरे (सासू), संभाजी रामा ढाकरे (सासरा, तिघे रा.डोणवाडा) यांच्या विरूध्द कलम ३०७, ३४ भादंविनुसार कुरूंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून अधिक तपास वसमतचे उपविभागीय पोलिस अधिकारी पियुष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली कुरूंदा ठाण्याचे पोलिस निरीक्षक नानासाहेब नागदरे, फौजदार सिध्दोधन जोंधळे, जमादार प्रकाश आवडे करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Married to a kerosene