दारुड्या पतीने पत्नीला जिवंत जाळले!

By Admin | Updated: December 18, 2014 00:42 IST2014-12-18T00:07:33+5:302014-12-18T00:42:33+5:30

औरंगाबाद : दररोज जाळून घेण्याची धमकी काय देतेस, हे घे आज मी जाळून टाकतो तुला, असे म्हणत दारुड्याने आपल्या पत्नीला पेटवून दिल्याची खळबळजनक घटना बालाजीनगरात घडली.

Married husband burnt his wife alive! | दारुड्या पतीने पत्नीला जिवंत जाळले!

दारुड्या पतीने पत्नीला जिवंत जाळले!

औरंगाबाद : दररोज जाळून घेण्याची धमकी काय देतेस, हे घे आज मी जाळून टाकतो तुला, असे म्हणत दारुड्याने आपल्या पत्नीला पेटवून दिल्याची खळबळजनक घटना बालाजीनगरात घडली.
या घटनेत भाजलेली महिला वंदना कंटुले (३०, रा. बालाजीनगर) हीस उपचारासाठी घाटीत दाखल करण्यात आले. पोलिसांनी घटनेबाबत सांगितले की, वंदनाचा पती अनिल कंटुले याला दारूचे व्यसन आहे. तो सतत दारू पिऊन घरी यायचा आणि पत्नी वंदनासोबत वाद घालायचा. त्यातून या पती-पत्नीत सतत खटके उडायचे. १५ डिसेंबर रोजी दुपारी दारूच्या कारणावरूनच वंदनाने पतीला ‘तुम्ही रोज रोज दारू पिऊन फिरता. त्यामुळे संसारावर आर्थिक ताण पडत आहे. तुमच्या दारूला मी वैतागले. दारू सोडा नाही तर जाळून घेऊन जीवच देते’ असे सुनावले.
त्यावरून अनिलने वाद घालण्यास सुरुवात केली. शब्दाने शब्द वाढत गेले आणि मग अनिलने ‘तू सतत जाळून घेण्याची धमकी काय देतेस. थांब तू कशाला जाळून घेते, मीच जाळतो तुला, असे म्हणत त्याने आगपेटी पेटवली आणि तिच्या अंगावर फेकली. त्यामुळे वंदनाच्या अंगावरील कपड्यांनी पेट घेतला त्यात ती भाजली.
या प्रकरणी वंदनाच्या फिर्यादीवरून जवाहरनगर पोलीस ठाण्यात आरोपी पती अनिलविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. फौजदार भोसले हे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Married husband burnt his wife alive!