शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या १,६०० जणांना नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 17:58 IST

विधानसभा निवडणुकीत गडबड-गोंधळ कराल, तर खबरदार...

ठळक मुद्देपोलीस प्रशासनाचा सज्जड दम ४५५ गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई 

औरंगाबाद : विधानसभा निवडणूक शांततेत आणि निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी शहर पोलिसांनी कडक उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या तब्बल १ हजार ६०० जणांना नोटिसा बजावल्या आहेत. निवडणूक काळात गडबड कराल, तर खबरदार, थेट जेलमध्ये जाल, असा इशाराच या नोटिसांच्या माध्यमातून त्यांना दिला आहे. याशिवाय पोलिसांच्या रेकॉर्डवरील ४५५ सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांच्याकडून बंधपत्र घेण्यात आले.

गतवर्षी झालेल्या विविध दंगलींमुळे शहराची शांतता धोक्यात आली होती. त्यातच आता विधानसभेसाठी निवडणूक होत आहे. ही निवडणूक शांततेत आणि निर्विघ्न व्हावी, याकरिता शहर पोलिसांनी विविध उपाययोजना करण्यास सुरुवात केली. पोलिसांच्या रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार, गत निवडणुकांमध्ये गडबड करणारे, मतपेट्या पळविणारे, मतदान केंद्रावर दहशत निर्माण केल्याचा गुन्हा असलेले, तसेच मतदारांना प्रलोभन देणारे अथवा धमकावण्याचे गुन्हे असलेल्या लोकांची यादीच पोलिसांकडे आहे. 

शिवाय हाणामारी, लुटमार आणि सार्वजनिक आणि खाजगी मालमत्तेचे नुकसान करणारे आणि चोरी आदी प्र्रकारचे दोन अथवा दोनपेक्षा अधिक गुन्हे असलेल्या आयुक्तालयाच्या हद्दीतील १ हजार ६०० जणांना पोलिसांनी सीआरपीसी कलम १४९ नुसार नोटिसा बजावल्या आहेत. निवडणूक कालावधीत तुम्ही गडबड करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे, तुमच्या कोणत्याही कृत्यामुळे शहराची शांतता धोक्यात आली, तर खबरदार, तुमच्याविरोधात कडक कारवाई केली जाईल, तसेच पुरावा म्हणून ही नोटीस ग्राह्य धरण्यात येईल, असा इशारा या नोटीसमधून देण्यात आला. पोलिसांनी प्रत्यक्ष कारवाईला प्रारंभ केला आहे. 

४५५ गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई पोलिसांच्या रेकॉर्डवरील ४५५ सराईत गुन्हेगारांवर पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. यापैकी ९४ जणांविरोधात सीआरपीसी ११० ची, तर सीआरपीसी १९७ ची ३५० लोकांविरोधात आणि ११ संशयितांवर सीआरपीसी १०९ कलमानुसार कारवाई केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस सूत्रांनी दिली. शिवाय तडीपारी आणि एमपीडीएसारखी कडक कारवाईही पोलिसांकडून केली जात आहे. काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांना तडीपारीच्या नोटिसा बजावल्याने ते भूमिगत झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

बंधपत्र न देणाऱ्या गुन्हेगाराला पाठविले कारागृहातविष्णूनगर येथील रहिवासी विजय सुभाष बिरारे याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केल्यानंतर त्याला एक लाख रुपयांचे हमीपत्र देण्याचा आदेश सहायक पोलीस आयुक्तांच्या न्यायालयाने दिला होता. मात्र, हमीपत्र न देऊ शकल्याने बिरारेला हर्सूल कारागृहात पाठविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Aurangabadऔरंगाबाद