शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाइट हाऊस गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
3
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
4
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
5
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
6
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
8
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
9
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
10
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
11
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
13
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
14
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
15
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
16
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
17
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
18
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
19
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
20
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

लोहारा-उमरग्यात जोरदार पाऊस

By admin | Updated: June 13, 2015 23:51 IST

उस्मानाबाद : शुक्रवारसह शनिवारीही जिल्ह्याच्या विविध भागात पावसाने दमदार हजेरी लावली. मागील काही दिवसात होत असलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरण्यांची तयारी सुरु केली आहे.

उस्मानाबाद : शुक्रवारसह शनिवारीही जिल्ह्याच्या विविध भागात पावसाने दमदार हजेरी लावली. मागील काही दिवसात होत असलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरण्यांची तयारी सुरु केली आहे. शुक्रवारी उमरगा तालुक्याला पावसाने झोडपले. शनिवारी पहाटेपर्यंत तालुक्यात ५२.८ मिमी एकूण पावसाची नोंद झाली आहे. यात मुरुम मंडळात ४० मिमी, दाळींब मंडळामध्ये ४२, उमरगा ४९, मुळज ४५ तर नारंगवाडी मंडळामध्ये २२ मिमी पाऊस झाला आहे. उस्मानाबाद तालुक्यात १२.८८, तुळजापूर ६.७१, भूम १२.८०, कळंब ५.६७, परंडा १८.४० तर वाशी तालुक्यात शनिवारी सकाळपर्यंत १६.१७ मिमी पाऊस झाला आहे. दरम्यान, शनिवारी दिवसभरही जिल्ह्याच्या विविध भागात पावसाने हजेरी लावली. उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे सुमारे एक तास मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. शुक्रवारी रात्री झालेल्या पावसामुळे मुरुम येथील बेन्नीतुरी नदीला पाणी आले होते. परिसरातील मुरुम, कोथळी, कंटेकूर, कदेर, मुरळी येथेही चांगला पाऊस झाला. लोहारा शहरासह तालुक्यात शनिवारी साडेचार वाजण्याच्या सुमारास अर्धातास पावसाने हजेरी लावली़ तर हिप्परगा (रवा) परिसरात दमदार पाऊस झाला़ या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांसह पेरणीच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे़ लोहारासह हिप्परगा (रवा), नागराळ, बेलवाडी, मोघा, खेड, धानुरी, लोहारा (खुर्द), मार्डी, बेंडकाळ आदी गावात शनिवारी साडेचार वाजण्याच्या सुमारास दमदार पावसाने हजेरी लावली. मागील दोन दिवसांपासून झालेल्या रिमझिम पावसानंतर हा पाऊस चांगला झाला. अनेक दिवसांपासून उकाड्याने हैराण असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पेरणीसाठी मोठ्या पावसाची आवश्यकता असल्याचे शेतकरी विजय लोमटे, शरण्णप्पा कबाडे, आयनोद्दीन सवार, सूर्यकांत बिराजदार यांनी सांगितले़(वार्ताहर)