शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: पश्चिम बंगालमध्ये भाजपा सरकार स्थापन करणार; ममता बॅनर्जींसोबत 'खेला होबे'
2
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
3
Success Story: एकेकाळी काँक्रिटच्या जमिनीवर झोपायचे लक्ष्मी मित्तल; आता ₹२७०००० कोटींची नेटवर्थ, IPL टीमचेही बनले मालक
4
बंगालमध्ये बाबरी मशीद बांधणारे हुमायूं कबीर २ जागांवर लढत होते, निकालात त्यांचे काय झाले?
5
Airplane Accident: लँडिंग करतानाच विमानाची ट्रकला धडक; न्यूयॉर्क विमानतळाजवळील घटनेचा व्हिडीओ बघा
6
Baramati Result 2026: सुनेत्रा पवारांना रेकॉर्डब्रेक मतदान; अजित पवारांचा विक्रम मोडत जादुई आकडा पार, एकतर्फी विजयाच्या दिशेने वाटचाल
7
ममता बॅनर्जी वि. सुवेंदू अधिकारी...! भवानीपूरमध्ये आतापर्यंत सात फेऱ्या झाल्या, प्रत्येक फेरीचा निकाल आला...
8
'तीन'वरून ७७ वर आणि आता थेट १९०+ आमदार! भाजपाचा थक्क करणारा 'सक्सेस रेट'; पश्चिम बंगालमध्ये कसं फुललं 'कमळ'
9
असह्य वेदना पण लेकाने शिकावं ही एकच इच्छा; माऊलीचा 'हा' Video पाहून पाणावतील डोळे
10
तृणमूल काँग्रेस पराभवाच्या उंबरठ्यावर, ममता बॅनर्जी हताश, पण सोडली नाही विजयाची आस, कार्यकर्त्यांना केलं असं आवाहन
11
पाकिस्तानने संधीचं सोनं केलं! इराणच्या मजबुरीचा फायदा घेत खोऱ्यानं पैसा ओढला; आता पडणार नोटांचा पाऊस!
12
Numerology: 'या' जन्मतारखेचे लोक असतात अति संवेदनशील; सभोवतालच्या वातावरणाचा खोलवर होतो परिणाम
13
थलापती विजयचे राज्यभरात ८५ हजार फॅन क्लब्स; TVK च्या विजयात निभावली सर्वात मोठी भूमिका
14
आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा
15
केरळमध्ये 'या' पक्षाने अवघ्या २७ जागा लढवल्या, त्यातील २३ जागांवर पुढे; २१ उमेदवार मुस्लीम
16
Thalapathy Vijay Net Worth: अभिनेता ते राजकारणी; ६०० कोटींपेक्षा अधिकचं साम्राज्य, कशी आहे थलापति विजय यांची लक्झरी लाईफ 
17
लग्नानंतर सासरची पायरी चढण्याआधीच मोडला संसार! २०० रुपयांच्या नोटेमुळे नवरदेवाचा असा झाला भांडाफोड
18
तीन राज्यं जिंकली, पण दोन राज्यांत भाजपाची निराशा; भोपळा फोडला, पण हवं तसं 'कमळ' फुलेना!
19
दाक्षिणात्य सुपरस्टार विजयला 'थलापती' का म्हणतात? जाणून घ्या ३२ वर्षे जुनी कहाणी!
20
IPL 2026: RCBला मोठा धक्का! तुफान घोडदौड सुरू असताना स्टार खेळाडू संघ सोडून घरी परतला
Daily Top 2Weekly Top 5

पूररेषेत राहताय? हलवा पसारा !

By admin | Updated: May 30, 2014 00:23 IST

बीड: बिंदूसरा नदीपात्राच्या लगत पूर रेषेत रहात असलेल्या ३५ कुटुंबांना बीड नगर परिषदेने पावसाळ्या पुर्वी स्थलांतर करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत.

बीड: बिंदूसरा नदीपात्राच्या लगत पूर रेषेत रहात असलेल्या ३५ कुटुंबांना बीड नगर परिषदेने पावसाळ्या पुर्वी स्थलांतर करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. यामध्ये खास बागेतील तुळजा भवानी मंदिर परिसरातील रहिवाशांचा समावेश असून सर्वेक्षण सुरू आहे. शंभरच्या जवळपास नागरिकांना पूर रेषेतून स्थलांतर करण्याच्या नोटीसा देण्याची शक्यता असल्याचे न.प. मधील अधिकार्‍यांनी सांगितले. पावसाळ्याला अजून आठ ते नऊ दिवस बाकी आहे. यातच बिंदूसरा नदीचे पात्र बीड शहरातून जात असल्याने जास्त पाऊस पडला तर शहरातील नदी पात्राच्या लगत रहाणार्‍या नागरिकांना याचा धोका होऊ शकतो. अचानक आलेल्या पावसामुळे मनुष्य हानी होऊ नये या दृष्टिकोनातून बीड नगर परिषदेकडून योग्य ती दक्षता घेण्यात येत आहे. बीड शहरातून जाणार्‍या बिंदूसरा नदीपत्राच्या लगत असलेल्या घरांचे सर्वेक्षण करण्याचे काम न. प. ने हाती घेतले आहे. यामध्ये गुरूवार पर्यंत ३५ जणांना पूर रेषेतून स्थलांतर करण्याच्या लेखी सूचना देण्यात आलेल्या असल्याचे न. प. तील स्वच्छता निरीक्षक विश्वंभर तिडके यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले. पुढील आठवड्यात शहरातील हिरालाल चौक परिसरात तसेच बिंदूसरा नदी पात्राच्या लगत रहात असलेल्या नागरिकांच्या घरांचा सर्व्हे करून स्थलांतराच्या नोटिसा बजावण्यात येणार असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.(प्रतिनिधी)