शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

मागासवर्गीय मुलांना लॅपटॉप

By admin | Updated: July 7, 2016 23:32 IST

हिंगोली : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या समितीने यंदा सेस निधीतून मागासवर्गीयांच्या २0१५-१६ मध्ये बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना लॅपटॉप वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे.

हिंगोली : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या समितीने यंदा सेस निधीतून मागासवर्गीयांच्या २0१५-१६ मध्ये बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना लॅपटॉप वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ३0 लाखांची तरतूद करण्यात आली आहे.जि.प.ने यंदा वैयक्तिक लाभाच्या त्याच त्या पारंपरिक योजनांना छेद देण्यासाठी मागील काही बैठकांत विविध पर्यायांवर विचारविनिमय चालविला होता. पीठ गिरणी, टीनपत्रे, कडबा कटर, शिलाई मशीन आदी पारंपरिक वैयक्तिक लाभाच्या योजनांमध्येच हा विभाग गुरफटून पडला. शिवाय याचा आता अनेकांना लाभ मिळाल्याने लाभार्थीही त्या संख्येने पुढे येत नाहीत. तर दुसऱ्यांदा लाभ मिळण्याची भीती लक्षात घेता योजनांचे स्वरुपच बदलले आहे.यामध्ये जिल्हा परिषदेच्या सेस निधीतून यावर्षी २0१५-१६ या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यास लॅपटॉप देण्याचा निर्णय समितीत घेण्यात आला. यासाठी ३0 लाखांची तरतूद ठेवली. पूर्वी ती २0 लाखच होती. मात्र सदस्यांनी ती वाढवून घेतली. विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्याच नव्हे, तर व्यावसायिकदृष्ट्याही हे लॅपटॉप उपयोगी पडू शकते. यात दर्जेदार व नामांकित कंपनीचेच लॅपटॉप असावे, असा सदस्यांनी आग्रह धरला. यात जेमतेम ७0 ते ८0 जणांना लाभ मिळू शकणार आहे. या बैठकीस सभापती सहेल्याबाई भोकरे, सदस्य कुंताबाई कऱ्हाळे, पंचफुला सावंत, संजय दराडे, मंगला कांबळे, गयबाराव नाईक, छबुबाई करवंदे, चंद्रकांत हराळ, शारदा केशव नाईक, समाजकल्याण अधिकारी ए.बी. कुंभारगावे, शुक्ला आदी हजर होते . (जिल्हा प्रतिनिधी)