शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

किलेअर्क येथील जागा महापालिकेच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:15 IST

औरंगाबाद : किलेअर्क येथील नाल्याजवळ महापालिकेच्या मालकीची जवळपास दोन हजार चौरस फूट जागा तीन दशकांपासून अतिक्रमित होती. बाजार मूल्यानुसार ...

औरंगाबाद : किलेअर्क येथील नाल्याजवळ महापालिकेच्या मालकीची जवळपास दोन हजार चौरस फूट जागा तीन दशकांपासून अतिक्रमित होती. बाजार मूल्यानुसार तीन कोटी रुपयांची ही जागा शुक्रवारी महापालिकेने पोलीस बंदोबस्तात ताब्यात घेतली. अतिक्रमण करणार्‍या नागरिकांनी प्रारंभी कडाडून विरोध केला. अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम यांनी घटनास्थळी धाव घेऊन कारवाई पूर्ण केली.

सिटी चौक ते किलेअर्कपर्यंत १५२ कोटी रुपयांच्या शासन निधीतून रस्ता आणि ब्रीज उभारण्यात येत आहे. पंचकुंआ कब्रस्तानजवळील पुरातन काळातील ब्रीजच्या बाजूला लागून महापालिकेच्या मालकीची जवळपास दोन हजार चौरस फूट जागा होती. सीटीएस क्रमांक ३८३३ याठिकाणी अतिक्रमण करण्यात आले होते. चारही बाजूने लोखंडी पत्रे लावून आत भंगार, लाकूड आदी सामान ठेवण्यात आले होते. महापालिकेने आपल्या मालकीची जागा ताब्यात घ्यावी म्हणून या भागातील दोन नागरिक वर्षभरापासून पाठपुरावा करीत होते. यासंदर्भात प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांचीही नागरिकांनी भेट घेतली होती. त्यांनी त्वरित अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम यांना जागा ताब्यात घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार मोठा पोलीस बंदोबस्त घेऊन शुक्रवारी सकाळी अतिक्रमण हटाव विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अतिक्रमण करणार्‍या शेख इलियास या व्यक्तीने कडाडून विरोध दर्शविला. महापालिकेने अगोदरच वेगवेगळ्या पद्धतीने सर्वेक्षण करून ही जागा आपल्या मालकीची आहे किंवा नाही याची शहानिशा केली होती. जागा ताब्यात घेण्यास विरोध होत असल्याचे लक्षात येताच अतिरिक्त आयुक्त स्वतः घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अवघ्या एका तासात जागेचा ताबा घेतला. उपायुक्त अपर्णा थेटे यांना जागा ताब्यात घेतल्याची माहिती देण्यात आली. त्यांनी वॉर्ड अभियंता काशिनाथ काटकर यांना त्वरित जागेच्या चारही बाजूने तार फेंसिंग करण्याचे आदेश दिले.

जागा ताब्यात घेण्यासाठी महापालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाच्या पदनिर्देशित अधिकारी सविता सोनवणे, आर. एस. राचतवार, वसंत भोये, इमारत निरीक्षक सय्यद जमशीद, पी. बी. गवळी, मालमत्ता विभागाचे मोईन अली, महापालिकेचे पोलीस पथक यावेळी उपस्थित होते.