शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाइट हाऊस गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
3
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
4
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
5
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
6
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
8
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
9
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
10
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
11
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
13
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
14
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
15
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
16
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
17
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
18
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
19
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
20
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

‘पॉलिटीकल मॅच्युरिटी’चा अभाव

By admin | Updated: May 8, 2015 00:28 IST

शिरीष शिंदे , बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे आर्थीक व्यवहार घोटाळ्यामुळे गेल्या तीन वर्षापासून ठप्प आहेत.

शिरीष शिंदे , बीडजिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे आर्थीक व्यवहार घोटाळ्यामुळे गेल्या तीन वर्षापासून ठप्प आहेत. सभासद व शेतकऱ्यांचा विश्वास जिंकण्यासाठी राजकीय पक्षांनी एकत्र येऊन बँकचे निवडणूक बिनविरोध काढायला हवी होती मात्र काही नेत्यांनी आपली विरोधाची भुमिका कायम ठेवली. एकंदरीत ‘पॉलेटीकल मॅच्युरीटी’चा आभाव निर्माण झाल्याने निवडणूक घेण्याची नामुष्की ओढावली गेली. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ताब्यात असताना माजी संचालक मंडळ व इतर संस्थांनी बनावट कर्ज घेतले. कोट्यावधीचे कर्ज न फेडले गेल्याने बँक डबघाईस आली. या घोटाळ्यापासून चार हात लांब रहावे यासाठी तत्कालीन संचालक मंडळाने राजीनामा दिला व त्यानंतर भाजपा व राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये आरोप प्रत्यारोप करण्यात आले. त्यातून गुन्हे दाखल करण्याचे राजकारणही झाले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही मुळात शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखली जाते. या बँकेतून शेतकऱ्यांना पीक कर्ज व इतर शेती संबंधीत कर्ज मिळतात. बँक बुडल्याने अनेक गरजवंत शेतकऱ्यांना इतर बँकेच उंबरठे झिजविण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सर्व पक्षांनी डीसीसी निवडणूक बिनविरोध काढून बँक वाचविण्याचा प्रयत्न करण्याची भुमिका पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यासह इतर नेत्यांवर होती मात्र तसे न करता केवळ आ. जयदत्त क्षीरसागर व माजी आ. धस यांना हाताशी धरत महायुती करण्यात आली व तडजोड करुन पाच उमेदवार बिनविरोध कढण्यात आले. पालक मंत्र्यांनी पालकत्व सिद्ध करण्याची संधी सोडली असल्याने राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. मुख्यमंत्री, सहकार मंत्र्यांनी घेतला रससदरील निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सहकार मंत्री शिंदे यांनी या निवडणुकीत रस घेतला होता. प्रारुप मतदार यादीनुसार निवडणूक पार पडली असती तर ही निवडणूक भाजपाला जड गेली असती.अंबाजोगाईतील एक जागा विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांना हवी होती. माजलगावची जागा माजी मंत्री सोळंके यांना पाहिजे होती तर आ. अमरसिंह पंडित यांना गेवराईच्या दोन जागा हव्या होत्या. शेवटी निवडणूक होऊनही आ. पंडित यांनी दोन जागा मिळविल्या तर सोळंके यांनी एक जागा मिळवली. विरोधी पक्ष नेत्यांना आपले वर्चस्व दाखविता आले नाही. या सर्वांचा आढावा घेतला तर निवडणूक बिनविरोध होण्यास काही हरकत नव्हती असे समजून येते. मात्र राजकीय सुड बुद्धी म्हणा की इतर काही म्हणा यातून काही राष्ट्रवादी काँगे्रसच्या नेत्यांना हाताशी धरुन काही लोकांना डावलले. भाजपाचे वारे असतानाही राष्ट्रवादीच्या एका गटाने आपले अस्तित्व सिद्ध केले. या निवडणूकी गेवराई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब नाटकर व अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दत्ता पाटील हे निवडणुकीचे आर्कषण राहिले.