शहरं
Join us  
Trending Stories
1
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
2
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
3
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
4
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
5
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
6
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
7
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
8
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
9
Travel : लडाखमध्ये इंजिन बंद असूनही गाड्या आपोआप चढतात डोंगर; या 'मॅग्नेटिक हिल'चं रहस्य काय?
10
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
11
भयंकर! फक्त एका लिंबूसाठी १२ वर्षांच्या मुलाची हत्या; संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेक
12
PM मोदी म्हणाले, १ वर्ष सोनं खरेदी करू नका; पण चांदीबद्दल काहीच का नाही बोलले? दर वर्षी किती चांदी खरेदी करतो भारत?
13
Top Marathi News Live: नाशिक: भोंदू अशोक खरातविरुद्ध SITकडून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल
14
इराणचा 'डर्टी बॉम्ब'! एका स्फोटात शहरं होतील ओसाड; अमेरिकन नौदलाला हाय अलर्ट
15
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
16
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
17
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
18
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
19
“मनमानी भाडेवाढ करणारे खासगी बस वाहतूकदार, अवैध प्रवासी ॲपवर कारवाई करा”: प्रताप सरनाईक
20
Huma Praveen : २ मुलींची जबाबदारी, १० वर्षे नोकरी, ५ वर्षे अपयश; किचनमध्ये केला अभ्यास, सून झाली ऑफिसर
Daily Top 2Weekly Top 5

आखाती देशात नोकरी देण्याचे आमिष

By admin | Updated: December 2, 2014 01:10 IST

वाळूज महानगर : आखाती देशात चांगली नोकरी लावण्याचे आमिष दाखवून ४२ बेरोजगारांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याची खळबळजनक घटना वाळूज औद्योगिक वसाहतीत उघडकीस आली आहे


वाळूज महानगर : आखाती देशात चांगली नोकरी लावण्याचे आमिष दाखवून ४२ बेरोजगारांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याची खळबळजनक घटना वाळूज औद्योगिक वसाहतीत उघडकीस आली आहे. चांगल्या नोकरीचे स्वप्न बघून गेलेल्या या बेरोजगारांना मुंबईहून रिकाम्या हाताने परतावे लागले.
आकाश शर्मा याने बजाजनगरातील जागृत हनुमान मंदिराजवळ दोन महिन्यांपूर्वी साई इंटरनॅशनल सर्व्हिसेस या नावाचे कार्यालय सुरू केले होते. शर्मा याने बेरोजगार युवकांना आखाती देशातील कुवैत आॅटोमोटिव्ह इम्पोर्टस् या नामांकित कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी लावण्याचे आमिष दाखविले होते. व्हिसा व नोकरीसाठी ६० ते ८० हजार रुपयांची मागणी या शर्माने केली. अल्पावधीतच ४२ बेरोजगारांनी शर्माकडे पैसे जमा केले. त्याने या बेरोजगारांना कुवैत आॅटोमोटिव्ह इम्पोर्टस् या कंपनीचे कॉल लेटर देऊन त्यांना ३० तारखेला कुवैतचे विमान असल्याचे सांगून मुंबईला बोलावले.
मुंबईतून एजंट फरार
हे ४२ बेरोजगार २९ ला मुंबईला पोहोचल्यानंतर आकाशने त्यांची एका लॉजमध्ये थांबण्याची व्यवस्था केली. दरम्यान, पासपोर्टवर स्टॅम्प व स्वाक्षरी बाकी असल्याची थाप मारून तो लॉजमधून पसार झाला.
निराश बेरोजगार परतले
या बेरोजगारांकडे व्हिसा नसल्यामुळे त्यांना विमानतळावरील सुरक्षा अधिकाऱ्यांनी प्रवेश नाकारला. विमानतळाच्या प्रवेशद्वारासमोरच आकाशची वाट बघत बेरोजगार थांबले. ३० नोव्हेंबरला कुवैतकडे जाणाऱ्या विमानाने झेप घेऊनही आकाश न आल्यामुळे या बेरोजगारांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी मुंबईच्या सहारा पोलीस ठाण्यात जाऊन हा प्रकार सांगितला. मात्र, घटना औरंगाबादला घडल्याचे कारण दर्शवून मुंबईच्या पोलिसांनी त्यांना औरंगाबादला तक्रार देण्याचा सल्ला दिला. अखेर काल रात्री निराश अवस्थेत बेरोजगार वाळूज औद्योगिक परिसरात परतले. आज त्यांनी एमआयडीसी वाळूज ठाण्यात पोलीस निरीक्षक इंदलसिंग बहुरे यांची भेट घेतली.
मोहंमद कमाल, असद अली, धरमनाथ गुप्ता, जोगेंदर राम, साबीर अली, मोहंमद फिरोज आलम, मोहंमद नदीम अन्वर, मोहंमद मुस्तकीम खान, मोहंमद शहेबाज आलम, राजेशकुमार सिंग, शैलेशकुमार सिंग, मोहंमद रब्बानी, हरिराम कुमार, रिजवान शेख, मोहंमद सिराय, मोहंमद ताहेर, मोहंमद सोहेल, साजीद आलम, सागर गुप्ता इ. जवळपास ४२ बेरोजगार युवकांची लाखो रुपयांची फसवणूक करून आकाश शर्मा हा भामटा फरार झाला आहे.