शहरं
Join us  
Trending Stories
1
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
3
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंबपरला कार धडकली, ८ जण ठार
4
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
5
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
6
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
8
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
9
मोदींच्या रोड शोमुळे मेट्रोसेवा बाधित; जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रोसेवा दोन तास बंद
10
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
11
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
12
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
13
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
14
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
15
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
16
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश
17
व्यावसायिकाच्या घरावर पोलिसांच्या मदतीने दरोडा; निवडणुकीसाठीचा पैसा दडवल्याचा बनाव
18
खार, वांद्रे परिसरांत ६६ लाखांची रोकड जप्त; आचारसंहिता भरारी पथकाची कारवाई
19
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
20
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य

खुलताबाद पंचायतसमिती कार्यालयात आग; समाजकल्याण विभागाचे सर्व रेकॉर्ड भस्मसात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2024 1:38 PM

आज सकाळी उघडकीस आली आगीची घटना

खुलताबाद: खुलताबाद पंचायतसमिती कार्यालयास शुक्रवारी रात्री आग लागली. यात समाजकल्याण विभागाचे सर्व रेकॉर्ड, अभिलेखे, जुन्या फाईली व प्रस्ताव आदीसह इतर कागदपत्रे जळून खाक झाली आहेत. ही घटना आज सकाळी उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. 

खुलताबाद पंचायत कार्यालयाच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे काम पूर्ण होऊन दहा महिने झाले आहेत. मात्र,  केवळ फर्निचरचे काम होत नसल्याने पंचायत समितीचे कामकाज सध्या शिक्षण विभागाच्या छोट्या जागेत सुरू आहे. ही इमारतही मोडकळीस आली आहे. त्यामुळे खिडक्या दरवाजे अर्धवट स्थितीत असतात. शुक्रवारी रात्री पंचायत समितीच्या कार्यालयात अचानक आग लागली. यात समाजकल्याण विभागाचे सर्व रेकॉर्ड, जुने प्रस्ताव, काही नवे, जुने अभिलेखे जळून खाक झाले.

दरम्यान, सकाळी ८ वाजता इमारतीतून धूर निघत असल्याचे काहींना दिसले त्यांनी सदरील माहिती गटविकास अधिकारी प्रकाश नाईक यांना दिली. गटविकास अधिकारी नाईक यांनी तात्काळ खुलताबाद येथे पोहचून कार्यालयाची पाहणी करत खुलताबाद पोलीसांना माहिती दिली. घटनास्थळी खुलताबाद पोलीसांनी पाहणी करून पंचनामा केला असून या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झाला नाही.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादfireआगpanchayat samitiपंचायत समिती