कलासागरची नवीन कार्यकारिणी

By Admin | Updated: December 24, 2014 01:03 IST2014-12-24T00:03:01+5:302014-12-24T01:03:00+5:30

औरंगाबाद : सांस्कृतिक क्षेत्रातील अग्रगण्य संस्था ‘कलासागर’ ची नवीन कार्यकारिणी जाहीर झाली आहे. यात अध्यक्षपदी राजलक्ष्मी लोढा यांची निवड झाली आहे.

Kala Sagar's new executive | कलासागरची नवीन कार्यकारिणी

कलासागरची नवीन कार्यकारिणी

औरंगाबाद : सांस्कृतिक क्षेत्रातील अग्रगण्य संस्था ‘कलासागर’ ची नवीन कार्यकारिणी जाहीर झाली आहे. यात अध्यक्षपदी राजलक्ष्मी लोढा यांची निवड झाली आहे. विशेष म्हणजे संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा आशू दर्डा यांच्यानंतर त्या संस्थेच्या दुसऱ्या महिला अध्यक्ष ठरल्या आहेत.
संस्थेची उर्वरित कार्यकारिणी पुढीलप्रमाणे- सचिव सुयोग रुणवाल, संयुक्त सचिव संदेश झांबड, कोषाध्यक्ष नीलेश अग्रवाल, सहकोषाध्यक्ष संचित राजपाल, क्रिएटिव्ह नितीन गुप्ता, सहक्रिएटिव्ह निर्मला चौधरी, जनसंपर्क अधिकारी शैलेश कासलीवाल यांचा समावेश आहे.
नवीन कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर आता संस्थेच्या वतीने पुढील वर्षभरात आयोजित कार्यक्रमांची रूपरेखा तयार केली जात आहे. मागील वर्षभरात कलासागरतर्फे विशाल- शेखर यांच्या बहारदार गाण्याचा कार्यक्रम, एमजे फाईव्हची नृत्य स्पर्धा, अभिनेता व संगीतकार वीरदास यांच्या कार्यक्रमाचे खूप कौतुक झाले होते.

Web Title: Kala Sagar's new executive