शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

अखेर जालना पालिकेला मिळाले लेखाधिकारी...!

By admin | Updated: February 17, 2016 00:32 IST

गंगाराम आढाव , जालना नगर पालिकेत मागील काही वर्षांपासून रिक्त असलेले म्हत्वाचे लेखाधिकारीपद अखेर शासनाने भरले खरे. मात्र, १५ दिवसांपूर्वी रूजू झालेल्या

गंगाराम आढाव , जालनानगर पालिकेत मागील काही वर्षांपासून रिक्त असलेले म्हत्वाचे लेखाधिकारीपद अखेर शासनाने भरले खरे. मात्र, १५ दिवसांपूर्वी रूजू झालेल्या अधिकाऱ्यांकडे अद्याप पालिकेने अधिकृतरित्या पदभारच दिला नसल्याने नव्याने नियुक्त झालेले लेखाधिकारी जी. आर. चिकटे यांनी पालिका मुख्याधिकाऱ्यांच्या दालनातच ठाण मांडले आहे.जालना नगर पालिका ही अ वर्ग पालिका आहे. या पालिकेतील लेखा विभागाचा पदभार पालिकेतील अन्य विभागातील अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात येत होता. सध्या उपमुख्याधिकारी क़ का. मुदखेडकर यांच्याकडे या पदाचा प्रभारी पदभार आहे.यापदावर जिल्हा कोषागार कार्यालयातील अप्पर कोषागार अधिकारी जी. आर. चिकटे यांची २९ जानेवारी रोजी जालना नगर पालिकेत लेखाधिकारीपदी बदली करण्यात आली. त्यानुसार त्यांनी २ फेबु्रवारी रोजी बदलीच्या ठिकाणी म्हणजे जालना पालिकेत रूजू झाले आहेत. विशेष म्हणजे रूजू होवून त्यांना १५ दिवसांचा कालावधी झालेला असतानाही अद्यापपर्यंत पालिकेने त्यांना अधिकृतपणे पदभार सोपविला नाही. त्यांना लेखाधिकारी म्हणून स्वतंत्र अशी कॅबीनही देण्यात आलेली नाही. एका दिवसापुरती पाणीपुरवठा सभापतींची कॅबीनमध्ये त्यांची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र दुसऱ्याच दिवशी त्यांना ती कॅबीन सोडण्यास भाग पाडण्यात आले. त्यामुळे ते थेट मुख्याधिकारी दीपक पुजारी यांच्या कॅबीनमध्येच आपले बस्तान मांडून आहेत. पुजारी यांच्या खुर्चीच्या शेजारीच खूर्ची लावून ते दिवसभर कार्यालयीन वेळेत तेथेच बसतात. दरम्यान नगर पालिका प्रशासनात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार सुरू असल्याची चर्चा आहे. मागील चार ते पाच वर्षांपासून नगर पालिकेचे स्वतंत्र असे लेखा परिक्षणही झाले नसल्याची चर्चा आहे. आता स्वतंत्र अधिकाऱ्यांची शासनाने नेमणूक केल्याने पालिकेतील अनेक विभागाच्या अधिकाऱ्यांना लेखा परिक्षणाची भीती वाटत आहे. नगर पालिका प्रशासनाकडून लेखाधिकाऱ्यास पदभार देण्यास टाळाटाळ होत असल्याची चर्चा आहे. लेखाधिकारी मिळाल्याने या अधिकाऱ्यांची अन्य अधिकाऱ्यांनी चांगलीच धास्ती घेतली आहे.