शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

बायपासच्या सर्व्हिस रोडचा प्रश्न बासणात; रस्त्यावर वाहतूक नव्हे तर वाहने, दुकाने मांडणे सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2021 19:24 IST

झाल्टा जंक्शन ते महानुभाव आश्रम चौकापर्यंत रस्त्यावर एक-एक पदर वाढवून वाहतुकीसाठी रस्ता तयार करून देण्यात येत आहे.

ठळक मुद्देदररोज किरकोळ स्वरूपाच्या अपघाताच्या घटना घडतच आहेत. अतिक्रमणे पाडली, रस्ता मोकळा केला; परंतु त्यावर भाजीपाला, तसेच व्यावसायिकांच्या गाड्या पुन्हा उभ्या करण्यात येत आहेत.त्यामुळे अघोषित वाहनतळ निर्माण होत आहे.

औरंगाबाद : अपघाताचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी व दुतर्फा वास्तव्यास असलेल्या नागरिकांचा वाहतूक प्रवास सुरळीत व्हावा म्हणून सर्व्हिस रोडसाठी अतिक्रमणे पाडली. अनेकांनी स्वत: काढून घेतली. दोन्ही बाजूने एक पदर वाढविल्याने सहा पदरी रस्ता करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे; परंतु तीन वर्षांनंतरही सर्व्हिस रोडचा प्रश्न बासनात पडला आहे. 

दक्षिण औरंगाबाद शहराच्या नावाने उदयास येत असलेल्या सातारा- देवळाई परिसराकडे पाहिले जात आहे. झाल्टा जंक्शन ते महानुभाव आश्रम चौकापर्यंत रस्त्यावर एक-एक पदर वाढवून वाहतुकीसाठी रस्ता तयार करून देण्यात येत आहे. परंतु जड वाहनांमुळे अद्यापही अपघाताचे प्रमाण टळलेले नाही, दोन दिवसांपूर्वीच दोन युवकांचा अपघातात मृत्यू झाला. दररोज किरकोळ स्वरूपाच्या अपघाताच्या घटना घडतच आहेत. पोलीस आयुक्त ते सार्वजिनक बांधकाम विभाग, मनपा, आरटीओ, जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठका झाल्या आहेत. दरवेळी रस्त्याचा विषय ऐरणीवर घेण्यात आलेला आहे; परंतु त्याकडे कुणीही फारसे लक्ष दिलेले नाही.

रस्त्यावर वाहतूक नव्हे तर वाहने, दुकाने मांडणे सुरूअतिक्रमणे पाडली, रस्ता मोकळा केला; परंतु त्यावर भाजीपाला, तसेच व्यावसायिकांच्या गाड्या पुन्हा उभ्या करण्यात येत आहेत. त्यामुळे अघोषित वाहनतळ निर्माण होत आहे. पुन्हा मनपाला अतिक्रमण हटाव मोहीम राबवावी लागते की काय, असा सवाल दक्ष नागरिकांतून उपस्थित होत आहे. महानुभाव आश्रम ते देवळाई फाटा वाहनाच्या वर्दळीमुळे नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. त्वरित लक्ष देऊन सर्व्हिस रोडचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी असतानाही त्याकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात असून, प्रश्न बासणात पडला असल्याचा समज नागरिकांचा झाला आहे.

दुतर्फा वाढवून डांबरीकरण होणार...बायपास रस्त्याच्या दुतर्फा एकेक पदरी रस्ता वाढविण्याचे काम सुरू असून, नियोजित सर्व्हिस रस्त्याविषयी वरिष्ठ निर्णय घेतील. रस्त्याचे काम जोरात सुरू असून, जनतेसाठी तो लवकरच वापरात येणार आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.- सुनील कोळसे (शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग)

टॅग्स :AccidentअपघातAurangabadऔरंगाबादTrafficवाहतूक कोंडी