युद्धाच्या तणावात 'शांती'चा शोध! इस्रायली दूतांची घृष्णेश्वर मंदिरात पूजा; वेरुळ लेणी पाहून थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 13:20 IST2026-05-12T13:20:09+5:302026-05-12T13:20:09+5:30

यानिव रेवाच यांचा छत्रपती संभाजीनगर दौरा; ऐतिहासिक वारसा स्थळांना भेट देत अनुभवली 'प्राचीन शिल्पकला'.

Israel's Consul General Yaniv Revach Visits Grishneshwar Temple and Ellora Caves; Performs Traditional Puja | युद्धाच्या तणावात 'शांती'चा शोध! इस्रायली दूतांची घृष्णेश्वर मंदिरात पूजा; वेरुळ लेणी पाहून थक्क

युद्धाच्या तणावात 'शांती'चा शोध! इस्रायली दूतांची घृष्णेश्वर मंदिरात पूजा; वेरुळ लेणी पाहून थक्क

छत्रपती संभाजीनगर : अमेरिका-इस्रायल-इराण युद्धाने जगभरात तणावाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत इस्रायलचे महावाणिज्यदूत यानिव रेवाच यांनी सोमवारी जगप्रसिद्ध वेरुळ लेणी तसेच देवगिरी (दौलताबाद) किल्ला आणि बीबी का मकबरादेखील पाहिला. भारतीय संस्कृती न्याहाळत त्यांनी घृष्णेश्वर मंदिर येथे नतमस्तक होत पारंपरिक पद्धतीने पूजा-अर्चा केली.

वेरुळ लेणीतील प्रभारी संरक्षण सहायक नीलेश कोळी, देवगिरी किल्ला आणि बीबी का मकबरा येथील संरक्षण सहायक संजय रोहणकर यांनी यानिव रेवाच यांचे स्वागत केले. गाइड भरत जोशी यांनी त्यांना वेरुळ लेणी, देवगिरी किल्ल्याविषयी माहिती दिली. वेरुळ लेणी, घृष्णेश्वर मंदिर, देवगिरी किल्ला आणि बीबी का मकबरा याविषयी खूप ऐकलेले आहे. आता प्रत्यक्ष हे सर्व पाहत असल्याचे यानिव रेवाच म्हणाले. वेरुळ लेणीत प्राचीन शिल्पकलेचे त्यांनी निरीक्षण केले. देवगिरी किल्ल्याची रचना पाहून ते भारावून गेले.

मंदिरात जाण्यासाठी शर्ट काढण्यास तत्काळ होकार
यानिव रेवाच यांनी घृष्णेश्वर मंदिरात जायचे, असे सांगितले. तेव्हा त्यांना या मंदिरात जाण्यासाठी शर्ट काढावा लागतो, असे सांगण्यात आले. तेव्हा त्यांनी त्यास तत्काळ होकार दिला. मंदिरात गेल्यानंतर पूजा-अर्चाही केली.

Web Title : युद्ध तनाव में 'शांति' की खोज: इजरायली राजदूत ने भारतीय स्थलों का दौरा किया

Web Summary : वैश्विक तनाव के बीच, इजरायली राजदूत यानिव रेवाच ने एलोरा गुफाओं, दौलताबाद किले और बीबी का मकबरा का दौरा किया। उन्होंने भारतीय संस्कृति को अपनाते हुए घृष्णेश्वर मंदिर में प्रार्थना भी की और प्राचीन कला और वास्तुकला पर विस्मय व्यक्त किया।

Web Title : Israeli Envoy Seeks 'Peace' Amid War Tension, Visits Indian Sites

Web Summary : Amid global tensions, Israeli envoy Yaniv Revach visited Ellora caves, Daulatabad fort, and Bibi Ka Maqbara. He also offered prayers at Grishneshwar temple, embracing Indian culture and expressing awe at the ancient art and architecture.