शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: पश्चिम बंगालमध्ये भाजपा सरकार स्थापन करणार; ममता बॅनर्जींसोबत 'खेला होबे'
2
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
3
Success Story: एकेकाळी काँक्रिटच्या जमिनीवर झोपायचे लक्ष्मी मित्तल; आता ₹२७०००० कोटींची नेटवर्थ, IPL टीमचेही बनले मालक
4
बंगालमध्ये बाबरी मशीद बांधणारे हुमायूं कबीर २ जागांवर लढत होते, निकालात त्यांचे काय झाले?
5
Airplane Accident: लँडिंग करतानाच विमानाची ट्रकला धडक; न्यूयॉर्क विमानतळाजवळील घटनेचा व्हिडीओ बघा
6
Baramati Result 2026: सुनेत्रा पवारांना रेकॉर्डब्रेक मतदान; अजित पवारांचा विक्रम मोडत जादुई आकडा पार, एकतर्फी विजयाच्या दिशेने वाटचाल
7
ममता बॅनर्जी वि. सुवेंदू अधिकारी...! भवानीपूरमध्ये आतापर्यंत सात फेऱ्या झाल्या, प्रत्येक फेरीचा निकाल आला...
8
'तीन'वरून ७७ वर आणि आता थेट १९०+ आमदार! भाजपाचा थक्क करणारा 'सक्सेस रेट'; पश्चिम बंगालमध्ये कसं फुललं 'कमळ'
9
असह्य वेदना पण लेकाने शिकावं ही एकच इच्छा; माऊलीचा 'हा' Video पाहून पाणावतील डोळे
10
तृणमूल काँग्रेस पराभवाच्या उंबरठ्यावर, ममता बॅनर्जी हताश, पण सोडली नाही विजयाची आस, कार्यकर्त्यांना केलं असं आवाहन
11
पाकिस्तानने संधीचं सोनं केलं! इराणच्या मजबुरीचा फायदा घेत खोऱ्यानं पैसा ओढला; आता पडणार नोटांचा पाऊस!
12
Numerology: 'या' जन्मतारखेचे लोक असतात अति संवेदनशील; सभोवतालच्या वातावरणाचा खोलवर होतो परिणाम
13
थलापती विजयचे राज्यभरात ८५ हजार फॅन क्लब्स; TVK च्या विजयात निभावली सर्वात मोठी भूमिका
14
आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा
15
केरळमध्ये 'या' पक्षाने अवघ्या २७ जागा लढवल्या, त्यातील २३ जागांवर पुढे; २१ उमेदवार मुस्लीम
16
Thalapathy Vijay Net Worth: अभिनेता ते राजकारणी; ६०० कोटींपेक्षा अधिकचं साम्राज्य, कशी आहे थलापति विजय यांची लक्झरी लाईफ 
17
लग्नानंतर सासरची पायरी चढण्याआधीच मोडला संसार! २०० रुपयांच्या नोटेमुळे नवरदेवाचा असा झाला भांडाफोड
18
तीन राज्यं जिंकली, पण दोन राज्यांत भाजपाची निराशा; भोपळा फोडला, पण हवं तसं 'कमळ' फुलेना!
19
दाक्षिणात्य सुपरस्टार विजयला 'थलापती' का म्हणतात? जाणून घ्या ३२ वर्षे जुनी कहाणी!
20
IPL 2026: RCBला मोठा धक्का! तुफान घोडदौड सुरू असताना स्टार खेळाडू संघ सोडून घरी परतला
Daily Top 2Weekly Top 5

बांधकामच्या पदोन्नत्यात अनियमितता

By admin | Updated: July 16, 2014 01:24 IST

बीड : जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागात कनिष्ठ अभियंता पदाच्या पदोन्नत्यांत अनियमितता झाल्याचा प्रकार समोर आला.

बीड : जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागात कनिष्ठ अभियंता पदाच्या पदोन्नत्यांत अनियमितता झाल्याचा प्रकार समोर आला. यासंदर्भात विभागीय आयुक्तांनी दोषींवर कारवाईचे आदेश दिले; पण जि.प. प्रशासनाने कुठलीच कारवाई केली नाही हे विशेष़बांधकाम विभागात २०१२ मध्ये कनिष्ठ अभियंता संवर्गातील पदोन्नतीच्या कोट्यातील रिक्त पदे भरण्यात आली होती़ मात्र ही पदे भरताना आयुक्तांची परवानगी घेण्यात आली नाही़ स्थापत्य अभियंता सहायक या पदावरुन कनिष्ठ अभियंता या पदावर पदोन्नती देणे आवश्यक आहे़ परंतु अपंगांचा कोटा दाखवून आंतरजिल्हा बदलीने चार पदे भरण्यात आली़ त्यांना सामावून घेताना बिंदू नामावली, सेवा ज्येष्ठता तपासणे आवश्यक होते़ परंतु त्याला देखील बगल दिल्याचे उघड झाले आहे़महत्वाचे म्हणजे जिल्हा परिषदेत कनिष्ठ अभियंता या पदाच्या पदोन्नतीसाठी कर्मचारी पात्र होते़ परंतु त्यांना डावलून आंतरजिल्हा बदलीने आलेल्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती बहाल करण्यात आली़ या संदर्भात आयुक्तांकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव जवळेकर यांना पत्र पाठवले़ बिंदू नामावली नोंद वहीत मागासवर्गीय कक्षाने नोंदविलेल्या अभिप्रायानुसार कारवाई न करणे, पूर्व परवानगी न घेता पदोन्नती कोट्यातील अपंग अनुशेष सरळसेवेने भरण्यासाठी जाहिरात प्रसिध्द करणे, सरळसेवेच्या कोट्यातील जास्तीत जास्त पदे भरलेली असताना आंतरजिल्हा बदलीने कनिष्ठ अभियंता यांना जि़ प़ मध्ये चुकीने सामावून घेणे, चुकीचा संदिग्ध अहवाल पाठविणे इत्यादीबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करुन शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश जानेवारी २०१४ मध्ये दिले होते़ मात्र सहा महिने उलटूनही कारवाई झालेली नाही़ त्यामुळे अनियमितता करणारे मोकाट आहेत़याबाबत बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस़ आऱ शेंडे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही़ (प्रतिनिधी)अतिरिक्त अभियंत्यांनाही डावललेआंतर जिल्हा बदलीने आलेल्या कनिष्ठ अभियंत्यांना नियुक्त्या देताना जवाहर रोजगार योजनेतील अतिरिक्त ठरलेल्या कनिष्ठ अभियंत्यांचाही विचार करण्यात आलेला नाही़ जवाहर योजनेतील अतिरिक्त कनिष्ठ अभियंत्यांना अद्याप सामावून घेतलेले नाही़ त्यांचा परिपूर्ण अहवाल सादर का केला नाही असा सवाल पत्रात आयुक्तांनी विचारला आहे़