नव्या सरकारच्या स्थापनेनंतर आंतरराष्ट्रीय विमानांचे उड्डाण

By Admin | Updated: May 26, 2014 01:15 IST2014-05-26T00:51:57+5:302014-05-26T01:15:37+5:30

औरंगाबाद : पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरातील चिकलठाणा विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्यासाठी थाई एअरवेज, मलेशियन एअरलाईन्स उत्सुक आहे.

International flight after the establishment of a new government | नव्या सरकारच्या स्थापनेनंतर आंतरराष्ट्रीय विमानांचे उड्डाण

नव्या सरकारच्या स्थापनेनंतर आंतरराष्ट्रीय विमानांचे उड्डाण

औरंगाबाद : पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरातील चिकलठाणा विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्यासाठी थाई एअरवेज, मलेशियन एअरलाईन्स उत्सुक आहे. आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होण्याचा मार्ग नव्या सरकारच्या स्थापनेनंतर मोकळा होणार आहे. त्यामुळे लवकरच चिकलठाणा विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानांचे उड्डाण होईल. केंद्रीय उत्पादन शुल्क व सीमा शुल्क परिषदेने (सेंट्रल बोर्ड आॅफ एक्साईज अँड कस्टम) चिकलठाणा विमानतळाचा आपल्या मानांकन यादीत नुकताच समावेश केला. यामुळे चिकलठाणा विमानतळ देशातील १९ वे आंतरराष्ट्रीय विमानतळ ठरले आहे. थाई एअरवेज, मलेशियन एअरलाईन्स विमानसेवा सुरू करण्यास उत्सुक आहेत. याबाबत प्रस्ताव सादर झाला आहे. या कंपन्यांच्या विमानसेवा सुरू करण्यासाठी विमानतळ प्राधिकरणाकडून काहीही अडचण नाही. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर प्रस्तावावर निर्णय होईल, अशी माहिती विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांनी दिली.

Web Title: International flight after the establishment of a new government