शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

लायन्स क्लब सदस्य संख्येत भारत अव्वल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2021 05:18 IST

सुवर्ण क्षण : आंतरराष्ट्रीय संचालक डॉ. नवल मालू यांच्या नेतृत्वात चमकदार कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : जगातील सर्वात मोठी सेवाभावी संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लायन्स क्लब इंटरनॅशनलमध्ये आजवर सदस्यसंख्येच्या बाबतीत अमेरिकेचे वर्चस्व होते. परंतु, आता मात्र भारत चमकदार कामगिरी करीत सदस्यसंख्येच्या बाबतीत अमेरिकेला मागे सारून जगभरातून प्रथम  क्रमांकावर येऊन विराजमान झाला आहे.५ जानेवारी रोजी लायन्स क्लबची सदस्यसंख्या जाहीर करण्यात आली. क्लबचे आंतरराष्ट्रीय संचालक तथा क्लबच्या मेंबरशिप कमिटीचे चेअरमन डॉ. नवल मालू यांच्या कार्यकाळात भारताने हे यश मिळविलेआहे. क्लबकडून करण्यात येणाऱ्या सेवाकार्यामध्ये तर भारत अव्वलस्थानी होताच, पण आता सदस्यसंख्येच्या बाबतीतही मोठे यश मिळाले आहे. भारतातील लायन्स क्लब सदस्यसंख्या २ लाख ८५ हजार तर अमेरिकेची २ लाख ७८ हजार आहे. यानंतर तिसऱ्या स्थानावर जपानआहे. १९१७ साली शिकागो येथे लायन्स क्लबची स्थापना झाली. भारतामध्ये १९५६ साली लायन्स क्लब सुरू झाले. ३० वर्षांपूर्वी अमेरिकेत लायन्स क्लबची सदस्यसंख्या ७ लाख तर भारतात ५० हजार एवढी होती. आज याबाबतीत भारताने घेतलेली उत्तुंग झेप कौतुकास्पद ठरली. २ लाखांपेक्षाही अधिक लोकांच्या मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, १०० पेक्षाही अधिक ब्लडबँक, नेत्र रुग्णालय असे अनेक सेवाभावी उपक्रम भारतात लायन्स क्लबतर्फे राबविण्यात येतात. हजारो सदस्य जोडल्यामुळे आता हे सेवाकार्य  अधिकाधिक तळागाळापर्यंत पोहोचविण्यात यश येणार, असा विश्वास डॉ. नवल मालू यांनी व्यक्त केला.माजी अध्यक्ष नरेश अग्रवाल, अशोक मेहता, सहअंतरराष्ट्रीय निर्देशक जे. पी. सिंग , व्ही. पी. नंदकुमार, एस. संपत यांच्यासह भारतातील सर्व काऊंसलिंग संचालक, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर यांचा या यशात सिंहाचा वाटा आहे, असे डॉ. मालू यांनी सांगितले. ६ महिन्यांत ५० हजार सदस्य 

सदस्यसंख्या टिकवून ठेवण्याचे आव्हान तर समोर आहेच, पण त्यासोबतच ३ लाख सदस्यसंख्येचा टप्पा पूर्ण करायचा, हा मानस आहे. जून २०२० मध्ये माझा कार्यकाळ संपणार होता, पण कोरोनाच्या जागतिक संंकटामुळे तो १ वर्षासाठी वाढविण्यात आला. याकाळात अधिकाधिक लोकांपर्यंत पोहाेचण्याचा प्रयत्न केला. त्याचेच हे यश आहे. कोरोनामुळे आपल्या जीवाची काहीही शाश्वती देऊ शकत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. असे असताना त्या ६ महिन्यांत ५० हजार सदस्य लायन्सच्या सेवाकार्यात आमच्यासोबत आले, ही खरोखरच आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे.- डॉ. नवल मालू, आंतरराष्ट्रीय संचालक, लायन्स क्लब