शहरं
Join us  
Trending Stories
1
नीट पेपरफुटीचा भंडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
2
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
3
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
4
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
5
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
6
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
7
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
8
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
9
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
10
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
11
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
12
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
13
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
14
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
15
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
16
नालेसफाईच्या ठेक्यात १५ टक्के लाचेची मागणी; एपीएमसी उपसचिव अडकला एसीबीच्या जाळ्यात
17
महाविद्यालयात किती रिक्त जागा; आज कळणार , अकरावी प्रवेश प्रक्रियेचा पुढील टप्पा २१ मेपासून 
18
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण; याचिकेवर सुनावणीस सुप्रीम कोर्टाचा नकार
19
‘डीसीजीए’ विमान इंधन स्वीचची  ‘बोईंग’मध्ये करणार चौकशी; पथक लवकरच अमेरिकेत जाऊन तपास करणार
20
भटके कुत्रे : सुप्रीम कोर्टाने आपली जबाबदारी झटकली; मनेका गांधींचा आरोप, पूर्वीचे आदेशच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

गंगापूरात नेत्यांच्या माघारीने चव्हाणांचा मार्ग मोकळा; सोनवणेंची बंडखोरी बंब यांच्यासाठी डोकेदुखी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2024 18:50 IST

प्रशांत बंब यांचे नियोजन भेदण्यासाठी सतीश चव्हाण यांनीदेखील तोडीस तोड रणनीती आखली असल्याचे बोलले जात आहे.

- जयेश निरपळ
गंगापूर :
गंगापूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट, उद्धवसेनेच्या नेत्यांनी आपले मागे घेतल्याने महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांचा रस्ता मोकळा झाला आहे. या मतदारसंघात आता महायुतीचे प्रशांत बंब व महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण यांच्यात अशी मुख्य लढत होणार आहे. भाजपचे डॉ. सुरेश सोनवणे यांनी बंडखोरी केल्याने महायुतीला याचा कितपत फटका बसेल, हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे. मात्र, बंब यांची डोकेदुखी वाढली आहे.

२०१९ च्या निवडणुकीप्रमाणे गंगापूर मतदारसंघात पुन्हा एकदा राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा, असा दुरंगी सामना होणार आहे. महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत बंब हे प्रत्येक वेळी निवडणुकीच्या शेवटच्या काळातील योग्य नियोजनासाठी ओळखले जातात; मात्र यावेळी त्यांना महाविकास आघाडीचे उमेदवार आ. सतीश चव्हाण यांच्या रूपाने तोडीस तोड उमेदवार मिळाला असून, चव्हाण यांनी या निवडणुकीची जोरदार तयारी केली आहे. बंब यांचे नियोजन भेदण्यासाठी चव्हाण यांनीदेखील तोडीस तोड रणनीती आखली असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या दोन दिग्गजांमध्ये कोण बाजी मारणार, हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे. बंब व चव्हाण यांच्यात अटीतटीचा सामना होणार असला तरी भाजपाच्या सोनवणे यांच्या उमेदवारीने मतदानामध्ये रंगत वाढली आहे.

जरांगे यांच्या निर्णयानंतर तिन्ही इच्छुकांची माघार
महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट, उद्धवसेना या पक्षांतील इच्छुकांनी आपला निर्णय मनोज जरांगे-पाटील यांच्या भूमिकेनुसार घेण्याचे ठरवले होते. त्यानंतर जरांगे यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याने या तिन्ही पक्षांतील इच्छुक किरण पाटील डोणगावकर, ॲड. देवयानी डोणगावकर, डॉ. ज्ञानेश्वर नीळ व विलास चव्हाण यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांना दिलासा मिळाला आहे.

निवडणुकीतील उमेदवार
१) प्रशांत बन्सीलाल बंब (महायुती), २) सतीश भानुदास चव्हाण (महविकास आघाडी), ३) सतीश तेजराव चव्हाण (बसपा), ४) अनिल अशोक चंडालिया ( वंचित), ५) ॲड.भारत आसाराम फुलारे ( राष्ट्रीय मराठा पार्टी ), ६) अनिता गणेश वैद्य (सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पार्टी), ७) सतीश हिरालाल चव्हाण सतीश (अपक्ष ), ८) देविदास रतन कसबे (अपक्ष), ९) बाबासाहेब अर्जुन गायकवाड (जय हिंद जय भारत राष्ट्रीय पक्ष), १०) संजय विठ्ठलराव तायडे (अपक्ष), ११) अविनाश विजय गायकवाड (अपक्ष ), १२) राजेंद्र आसाराम मंजुळे (अपक्ष ), १३) पुष्पा अशोक जाधव (अपक्ष), १४) किशोर गोरख पवार (अपक्ष), १५) बाबासाहेब तात्याराव लगड (अपक्ष ), १६) शिवाजी बाबुराव ठुबे (अपक्ष), १७. गोरख जगन्नाथ इंगळे (अपक्ष), १८) डॉ.सुरेश साहेबराव सोनवणे (अपक्ष)

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४gangapur-acगंगापूरmarathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकSatish Chavanसतीश चव्हाणPrashant Bambप्रशांत बंब