छत्रपती संभाजीनगर: नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालमत्तांवर झालेल्या 'बुलडोजर' कारवाईचा एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी तीव्र निषेध केला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी या कारवाईला 'राजकीय सुडबुद्धी' असल्याचे सांगत प्रशासकीय कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
प्रशासकीय घाई आणि 'गुंडाराज'
जलील यांनी विचारले की, मतीन पटेल यांच्या वकिलांनी न्यायालयात १५ दिवसांची मुदत मागितली असताना महापालिकेने त्याला विरोध का केला? "एवढी घाई करून कारवाई करण्याची काय गरज होती? शहरात फक्त एकच घर अनधिकृत आहे का? हा काय राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न होता का?" असे सवाल त्यांनी उपस्थित केले. राज्यात सध्या लोकशाही नसून 'गुंडाराज' सुरू असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला.
संजय शिरसाट यांना इशारा
निदा खान प्रकरणावरून मंत्री संजय शिरसाट यांनी केलेल्या आरोपांवर जलील आक्रमक झाले. "निदा खान माझी नातेवाईक आहे, हे शिरसाट यांनी पुराव्यासह सिद्ध करावे, अन्यथा मी त्यांना न्यायालयात खेचेन," असा सज्जड इशारा त्यांनी दिला. शिरसाट हे काही न्यायालय नाहीत आणि त्यांच्या आरोपांना आपण काडीमात्र महत्त्व देत नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
Web Summary : Imtiaz Jaleel condemned the demolition of Matin Patel's property, alleging political vendetta and a 'goonda raj' in Maharashtra. He challenged Sanjay Shirsat's claims about Nida Khan, threatening legal action if proof isn't provided.
Web Summary : इम्तियाज जलील ने मतीन पटेल की संपत्ति पर बुलडोजर कार्रवाई की निंदा की और इसे राजनीतिक प्रतिशोध बताया। उन्होंने महाराष्ट्र में 'गुंडाराज' का आरोप लगाया। उन्होंने निदा खान के बारे में संजय शिरसाट के दावों को चुनौती दी और सबूत न देने पर कानूनी कार्रवाई की धमकी दी।