शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यासमोर टिच्चून चालते अवैध वाहतूक

By admin | Updated: July 30, 2015 00:31 IST

लातूर : शिवाजीचौक ते रेणापूर नाक्यापर्यंतचा अंबाजोगाई रोड वाहतुकीच्या विळख्यात सापडला आहे़ पोलिसांसमोरच शिवाजीनगर पोलिस ठाण्यासमोरच टिच्चून

लातूर : शिवाजीचौक ते रेणापूर नाक्यापर्यंतचा अंबाजोगाई रोड वाहतुकीच्या विळख्यात सापडला आहे़ पोलिसांसमोरच शिवाजीनगर पोलिस ठाण्यासमोरच टिच्चून प्रवासी भरत अवैध वाहने सुसाट वेगाने दामटली जातात़ विनानंबरप्लेट धावणारी वाहने वाहतूकशाखा व चार्ली पोलिसांच्याही आवाक्याबाहेर आहेत़ शिवाजी चौक, धर्मादाय आयुक्त कार्यालय, अल्पसंख्यांक महामंडळ, एसटी वर्कशॉप, परिवहन कार्यालय, जुना रेणापूरनाका, नवीन रेणापूर नाक्याच्या दोन्ही बाजूने बेशिस्त पार्कींगमुळे वाहतुकीचा खोळंबा होत आहे़ नव्या बसस्थानकातून प्रवाशांची पळवापळवी केली जाते़ काही काळी-पिवळी वाहने जुना रेणापूर नाका येथे ग्राहकांच्या प्रतिक्षेत थांबत असल्याने चौकातील वाहतूकीची कोंडी होत आहे़ शिवाय नवीन रेणापूर नाक्यावर वाळूची अवैध वाहने अस्ताव्यस्त उभी राहत असल्याने वाहतूक ठप्प होते़ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसणारी बेशिस्त वाहतूक पोलिसांना नियंत्रीत करता येत नाही़ अधिकाऱ्यांच्या वाहनांनाही सुसाट वेगात ओव्हरटेक करणारे वाहनचालक कारवाईच्या कक्षेबाहेर राहतात़ अंबाजोगाई-रेणापूरकडून व शहरातून तसेच औशाकडून येणाऱ्या वाहनांची या रस्त्यावर वर्दळ आहे. त्यात रस्त्यावर पार्किंग झालेल्या वाहनतळामुळे रहदारीला अडथळा होत आहे. विशेष म्हणजे याच रस्त्यावर पोलिस अधीक्षकांचे कार्यालय आहे. तरीपण या रस्त्यावरील वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन सर्रासपणे दिसून येत आहे. (प्रतिनिधी) शिवाजी चौक ते रेणापूर नाका असलेल्या या प्रमुख रस्त्यावर मंगल कार्यालय, दोन महाविद्यालये, एस.पी. कार्यालय, बसस्थानक, वैद्यकीय महाविद्यालये आणि खाजगी रुग्णालये आहेत. त्यामुळे वाहनधारकांची वर्दळ असते. परंतु, पोलिस वाहतूक शाखेचे याकडे दुर्लक्ष आहे.