शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

‘हम दो, हमारे दो’ऐवजी ‘हमारा एक ’चा रुजतोय विचार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 11:44 IST

कुटुंबात एकच अपत्य हवे, निर्णय घेण्यात महिला आघाडीवर

ठळक मुद्देमुलांचे करीअर आणि आरोग्य हेही यामागचे महत्त्वाचे कारणकु टुंबनियोजन शस्त्रक्रियांमध्ये महिलांचा सहभाग अधिक आहे.

- संतोष हिरेमठ

औरंगाबाद : पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांचा आवश्यक असलेला वेळ, वाढती महागाई, शिक्षणाचा वाढत जाणारा खर्च, अशा विविध कारणांमुळे आता ‘हम दो, हमारे दो’ऐवजी आता ‘हम दो, हमारा एक’ याकडे नागरिकांचा कल वाढतो आहे. विशेषत: शहरामध्ये या नव्या संकल्पनेचे प्रमाण अधिक आहे. 

शहर असो की ग्रामीण भाग, पूर्वी कुटुंबात एकापेक्षा जास्त अपत्ये असण्याचे प्रमाण अधिक होते. मात्र, वाढत्या लोकसंख्येमुळे अनेक समस्या निर्माण होत असल्याची बाब पुढे आली. त्यातून छोटे कुटुंब ठेवण्यासंदर्भात विविध माध्यमांतून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली. ‘हम दो, हमारे दो’ ही संकल्पना मोठ्या प्रमाणात रुजली. यामध्ये आता आणखी एक पाऊल पडले आहे. एकच अपत्य ठेवण्याकडे कल वाढत आहे. शिवाय चौथ्या राष्ट्रीय कुटुंब कल्याण सर्वेक्षणातही ‘हम दो, हमारा एक ’ म्हणणाऱ्या महिलांचे प्रमाण वाढल्याची बाब पुढे आली होती. 

शहरात अनेक दाम्पत्ये आहेत, ज्यांना एकच मूल आहे. मुलगा असो की मुलगी, एकच अपत्य ठेवण्याचा निर्णय घेऊन पाल्याच्या सर्वांगीण वाढीकडे लक्ष दिले जात आहे. एक अपत्य ठेवण्यामागे अनेक कारणे आहेत. लग्नाचे वाढते वय, त्यामुळे प्रसूतीदरम्यान निर्माण होणारी गुंतागुंत, करिअर हेदेखील त्यातील कारण आहे. जिल्ह्यात वर्षभरात १२ हजार कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया झाल्या. कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेत पुरुष मात्र मागेच आहेत. या शस्त्रक्रियेसाठी पुरुषांमध्ये जागृती नाही. त्यामुळे वर्षभरात अवघे काही पुरुषच ही शस्त्रक्रिया करून घेत असल्याचे चित्र आहे.

मनपा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर म्हणाल्या की, छोटे कुटुंब ठेवण्याचा कल वाढत आहे. विशेषत: कु टुंबनियोजन शस्त्रक्रियांमध्ये महिलांचा सहभाग अधिक आहे. 

मुलगा सीए झालामुलगा असो की मुलगी, एकच अपत्याचा निर्णय मी आणि पत्नी आशा हिने मिळून घेतला होता. त्याच्या पालनाकडे चांगल्या प्रकारे लक्ष देता येईल, ही त्यामागील भूमिका होती. एकच मुलगा आहे. तो आता सीए झाला असून, सध्या आॅस्ट्रेलियात आहे. छोट्याशा कुंटुंबामुळे आम्ही अत्यंत समाधानी आहोत.- संजय औरंगाबादकर

काळाची गरजलहान कुटुंब हे नेहमी आनंदी असते. त्यामुळेच ‘लहान कुटुंब, आनंदी कुटुंब’ असे म्हटले जाते. एकच मुलगा आहे. छोटे कुटुंब ही काळाची गरज आहे. त्यामुळे पती आणि मी दोघांनी एकत्रित निर्णय घेतला. मुलाच्या सर्वांगीण वाढीसाठी आम्ही प्रयत्न करतो. - उज्ज्वला ज्ञानेश्वर बनसोडे

टॅग्स :FamilyपरिवारHealthआरोग्यAurangabadऔरंगाबाद