गारपीटग्रस्तांना अनुदान मिळेना

By Admin | Updated: July 9, 2014 00:07 IST2014-07-08T23:46:04+5:302014-07-09T00:07:38+5:30

हिंगोली : तलाठी आणि कृषी सहाय्यकाने घरी बसून सर्व्हेक्षण केल्यामुळे नुकसान होवोनही शेतकऱ्यांना भरपाई मिळालेली नाही.

Horticulture sufferers get subsidy | गारपीटग्रस्तांना अनुदान मिळेना

गारपीटग्रस्तांना अनुदान मिळेना

हिंगोली : तलाठी आणि कृषी सहाय्यकाने घरी बसून सर्व्हेक्षण केल्यामुळे नुकसान होवोनही शेतकऱ्यांना भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे या सर्व्हेक्षणाची चौकशी करून न्याय देण्याची मागणी पेडगाव येथील शेतकऱ्यांनी हिंगोली तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
नुकसानीचे सर्व्हेक्षण तलाठी आणि कृषी सहाय्यकाने घरी बसून केला आहे. शिवाय अनेकांनी बोगस नावे यादीत टाकली आहेत. चौकशी करून वंचित शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे केली आहे. संतोष बांगर, विठ्ठल चौतमल यांच्या उपस्थितीत हे निवेदन देण्यात आले. निवेदनावर नथ्थू राठोड, रूखमाबाई चव्हाण, आनंदराव देवकते, माधव देवकते, सिंधूबाई देवकते, कैलास राठोड, शंकर राठोड, फुलसिंग राठोड, वकील आडे यांची नावे आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Horticulture sufferers get subsidy