गारपीटग्रस्त शेतकरी अधिकार्‍यांना भेटले

By Admin | Updated: June 1, 2014 00:27 IST2014-06-01T00:01:28+5:302014-06-01T00:27:14+5:30

मन्नास पिंपरी: सेनगाव तालुक्यातील मन्नास पिंपरी येथील दोन महिन्यांपूर्वी झालेल्या गारपिटीने रबी पिकाचे अतोनात नुकसान झाले;

Hail farmer meets the officials | गारपीटग्रस्त शेतकरी अधिकार्‍यांना भेटले

गारपीटग्रस्त शेतकरी अधिकार्‍यांना भेटले

मन्नास पिंपरी: सेनगाव तालुक्यातील मन्नास पिंपरी येथील दोन महिन्यांपूर्वी झालेल्या गारपिटीने रबी पिकाचे अतोनात नुकसान झाले; परंतु तलाठ्याने चुकीच्या पद्धतीने सर्वे केल्यामुळे ८० टक्के शेतकरी गारपिटीच्या अनुदानापासून वंचित राहिले आहेत. त्यांची नावे यादीत समाविष्ट करून अनुदान त्वरीत देण्यात यावे, अशी मागणी जिल्हाधिकार्‍यांकडे करण्यात आली आहे. मन्नास पिंपरी येथील शेतकर्‍यांनी ३१ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जावून मागणीचे निवेदन दिले. यावेळी दत्तराव पारीसकर, शेख खाजा, संतोष नागुलकर, रामेश्वर हेकड, डॉ. गजानन पारीसकर, ज्ञानबा पारीसकर, जनार्धन पारीसकर, दत्तराव सोनुने, गजानन राऊत, रामेश्वर सोनुने, सागर ढोरे, सुभाष मोरे, मोहन शिंदे, नारायण राऊत, शालीकराव मोरे, सुरेश नेहूल यांच्यासह शंभराहून अधिक शेतकरी उपस्थित होते. वादळी वार्‍यांसह गारपिट झाल्याने पिके उद्ध्वस्त झाली; परंतु तलाठी सूर्यवंशी यांनी स्थळपंचनामा न करताच घरी बसून सर्वे केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. या प्रकारामुळे ८० शेतकरी प्रत्यक्ष लाभापासून वंचित राहिले आहेत. त्यांची नावे नुकसानग्रस्तांच्या यादीत समाविष्ठ करून त्यांना अनुदान द्यावे. तसेच संबंधित तलाठ्यावर कार्यवाही करावी, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. (वार्ताहर)

Web Title: Hail farmer meets the officials